JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! माफी मागून माहेराहून परत आणलं; मग रस्त्यातच दाताने चावा घेत तोडलं पत्नीचं नाक

धक्कादायक! माफी मागून माहेराहून परत आणलं; मग रस्त्यातच दाताने चावा घेत तोडलं पत्नीचं नाक

शनिवारी घरी परत जात असताना पती ज्ञानदत्तने पत्नीला आपला साथीदार बिन्नू आणि एका अज्ञाताच्या मदतीने तिकोरामोड चौकीजवळ पकडलं. यानंतर त्याने दाताने तिचं नाव चावलं

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 05 जून : उत्तर प्रदेशातील बहराइचमधून अनैतिक संबंधांच्या (Extramarital Affair) संशयावरून एका विक्षिप्त व्यक्तीने पत्नीचं नाक कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पत्नी गंभीर जखमी झाली. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावं लागलं. Amaravati : किरकोळ भांडणातून आधी पत्नीच्या गळ्यावर मारली लाथ, नंतर गाठला क्रूरतेचा कळस मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बहराइचमधील कोतवाली ग्रामीण भागातील बेदनापूर येथील आहे. रजनी देवी नावाची महिला बेदनापूर येथील विद्युत विभागात कर्मचारी आहे. रजनीचं आपला पती ज्ञानदत्त पाठक याच्याशी भांडण झालं होतं. त्यानंतर ती रागावून माहेरी गेली. महिला माहेरी गेल्यानंतर पतीने फोन करून तिची माफी मागितली आणि तिला घरी बोलावलं. यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांसह तिकोरामोडजवळ दाताने पत्नीचं नाक चावलं. यानंतर गंभीर अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बोंडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाठकपट्टी रामगढी येथील २६ वर्षीय रजनी देवी या बेदनापूर उत्तमनगर वीज उपकेंद्रात कंत्राटी कामगार आहेत. पती ज्ञानदत्त पाठक याच्यासोबत तिचा काहीतरी वाद सुरू होता. या प्रकरणी बोंडी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर महिला रागावून माहेरी गेली. यानंतर पती गोंडा जिल्ह्यातील कर्नलगंज येथील बांसगाव येथे सासरच्या घरी पोहोचला आणि पत्नीची माफी मागून तरी घरी परत बोलावलं. दुसऱ्या प्रियकराच्या मदतीनं प्रेयसीनं पहिल्या प्रियकरासोबत केलं धक्कादायक कृत्य शनिवारी घरी परत जात असताना पती ज्ञानदत्तने पत्नीला आपला साथीदार बिन्नू आणि एका अज्ञाताच्या मदतीने तिकोरामोड चौकीजवळ पकडलं. यानंतर त्याने दाताने तिचं नाव चावलं. त्याने पत्नीला मारहाणही केली. पीडितेची आई कुसुम तिवारी यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तोडफोड करणाऱ्या जावयाचे नाव घेऊन तक्रार दिली आहे. महिलेला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पीडितेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या