JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Gujarat Drugs Case : गुजरातमध्ये ATS चा धडाका, तब्बल 600 कोटींचं हेरॉईन जप्त

Gujarat Drugs Case : गुजरातमध्ये ATS चा धडाका, तब्बल 600 कोटींचं हेरॉईन जप्त

Gujarat Drugs Case : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात शेकडो कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो नाही तर गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (Gujarat ATS) करण्यात आली आहे.

जाहिरात

गुजरात एटीएसकडून तिघांना बेड्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गांधीनगर, 15 नोव्हेंबर : महाराष्ट्र (Maharashtra) पाठोपाठ आता गुजरातमध्ये (Gujarat) देखील ड्रग्ज तस्करांविरोधात (Drugs Peddler) धडाकेबाज कारवाई सुरु आहे. गुजरातच्या मोरबी (Morbi) जिल्ह्यातून शेकडो कोटींचं ड्रग्ज  जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) नाही तर गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (Gujarat ATS) करण्यात आली आहे. या कारवाईत एटीएसने तब्बल 600 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे.

एटीएसकडून तिघांना बेड्या

संबंधित कारवाई ही मोरबी जिल्ह्यातील जांजुरा गावात करण्यात आलीय. तसेच याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुजरातचे कॅबिनेट मंत्री हर्ष सांगवी यांनी ट्विटरवर या कारवाईबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ड्रग्ज पाकिस्तानातून आणला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हेही वाचा :  भर दिवसा CISF जवानाच्या पत्नीवर गोळीबार

पोलिसांची प्रतिक्रिया

डिजीपी आशिष भाटीया यांनी प्रसारमाध्यमांना या कारवाईबाबत माहिती दिली आहे. “या कारवाईत एटीएसने 120 किलो हेरॉईन पकडली आहे. त्याची किंमत 600 कोटी रुपये आहेत. एटीएसने या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी इतक्या मोठ्या प्रमाणातील हेरॉईन हे सागरी मार्गाने आणले होते. आरोपींना या हेरॉईनची पाकिस्तानी बोटीतून डिलिव्हर मिळाली होती, असं प्राथमिक तपासातून समोर येत आहे”, अशी माहिती डिजीपी भाटीया यांनी दिली.

हेही वाचा :  पत्नीच्या समोरच आरएसएस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

याआधी देखील गुजरातमध्ये हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त

महाराष्ट्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीकडून गेल्या वर्षभरापासून ड्रग्ज विरोधात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. त्यानंतर आता गुजरातमध्येही ड्रग्ज तस्करांविरोधात कडक कारवाई सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यातच गुजरातमध्ये 350 कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. त्याची किंमत तब्बल 9 हजार कोटी रुपये इतकी होती. विशेष म्हणजे मुंद्रा पोर्टची मालकी ही अदानी समूहाकडे असल्याने मोठी चर्चा रंगली होती. अनेकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या