JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Shocking News: लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीची ओढणी घेऊन गेला अन्.., नवरदेवाचं धक्कादायक पाऊल

Shocking News: लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीची ओढणी घेऊन गेला अन्.., नवरदेवाचं धक्कादायक पाऊल

रविवारी रात्री उशिरा नववधू बाथरूमसाठी खोलीतून बाहेर येताच वराने दरवाजा आतून लावला. त्यानंतर बेडवर पडलेल्या नववधूच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.

जाहिरात

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीच्या ओढणीने नवरदेवाने घेतला गळफास (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 30 मे : ज्या घरात लग्नामुळे आनंदाची सनई वाजायला हवी होती, त्या घरात शोककळा पसरली. एका दिवसापूर्वी नववधू म्हणून सासरी आलेल्या मुलीची आता दुरवस्था झाली. क्षणार्धात तिचा आनंद नष्ट झाला. हे प्रकरण कन्नौज जिल्ह्यातील तालग्राम पोलीस स्टेशन परिसरातील मछरयाशी संबंधित आहे. येथे लग्नाच्या दुसऱ्याच रात्री वराने खोलीचा दरवाजा बंद करून वधूच्या ओढणीने गळफास लावून घेतला. नवरीने पतीला फासावर लटकलेलं पाहिलं तेव्हा तिने आरडाओरडा केला. आरडाओरडा केल्यावर कुटुंबीयांनी घाईघाईने दरवाजा तोडून तरुणाला खाली उतरवून जवळच्या रुग्णालयात नेलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत्यूची बातमी समजताच घरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. लग्नाच्या दिवशी नवरी पळाली; नवरदेवाने केलं असं काही की 13 दिवसांनी घरी येत त्याच्यासोबतच केला विवाह मछरया गावातील रहिवासी रामखिलावन यांचा मुलगा मनोज यादव (22) याचं लग्न जशोदा देवीपुरवा येथील रहिवासी लल्लू यादव यांची मुलगी गोल्डी हिच्याशी निश्चित झालं होतं. 26 मे रोजी मोठ्या थाटामाटात वरातीचं आगमन झालं आणि लग्नाचा कार्यक्रम आटोपून 27 मे रोजी वधूची पाठवणी करण्यात आली. नववधूच्या आगमनाने संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. रविवारी रात्री उशिरा नववधू बाथरूमसाठी खोलीतून बाहेर येताच वराने दरवाजा आतून लावला. त्यानंतर बेडवर पडलेल्या नववधूच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. नवरी खोलीत परत आली तेव्हा दरवाजा बंद होता. तिने खिडकीतून डोकावलं तर तिचा नवरा फासावर लटकत होता. वधूने आरडाओरडा करताच नातेवाईकांनी खोलीकडे धाव घेत घाईघाईने दरवाजा तोडून मनोजला खाली उतरवून रुग्णालयात नेलं. येथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या