JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / रोज मारायची प्रेयसी, पण लाजून तरुणाने तक्रार केली नाही अन् शेवटी घडली हादरवणारी घटना

रोज मारायची प्रेयसी, पण लाजून तरुणाने तक्रार केली नाही अन् शेवटी घडली हादरवणारी घटना

गर्लफ्रेंड या तरुणाला रोज मारहाण करत असे. मात्र बदनामी टाळण्यासाठी मुलाने पोलिसांत तक्रार केली नाही. घरच्यांनाही सांगितलं नाही आणि एक दिवस..

जाहिरात

प्रेयसीने घेतला जीव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 मे : नात्यात वाद होतच राहतात. पण अनेकदा प्रकरण इतकं टोकाला जातं की तोपर्यंत ते हाताळायला उशीर होतो. लोक लाजेपोटी ही गोष्ट कोणाला सांगत नाहीत आणि परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. या व्यक्तीचं एका मुलीवर प्रेम होतं. दोघं एकत्र राहू लागले. अचानक दोघांमध्ये वाद होऊ लागले. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. गर्लफ्रेंड या तरुणाला रोज मारहाण करत असे. मात्र बदनामी टाळण्यासाठी मुलाने पोलिसांत तक्रार केली नाही. घरच्यांनाही सांगितलं नाही. आणि एक दिवस याचा अतिशय भयानक शेवट झाला.

दक्षिण लंडनमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय ताई ओ डॅनियलची दोन वर्षांपूर्वी 22 वर्षीय कमिला अहमदशी भेट झाली होती. बोलत असताना दोघे प्रेमात पडले आणि एकत्र राहू लागले. डॅनियलne एक संगीत निर्माता बनण्याची इच्छा होती आणि तो एक सुंदर गायकही होता. तर कमिला हिस्ट्रीशीटर गुन्हेगार होती. तिच्यावर दरोडा, मारहाणीसह अकरा गुन्हे दाखल आहेत. 2015 मध्ये तिने प्रियकरावर चाकूने हल्ला केला होता. डॅनियलला याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि दोघंही एकत्र राहत होते. एके दिवशी अचानक कमिलाचा डॅनियलशी वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. डॅनियलला वाटलं की हे नॉर्मल आहे, मात्र पुढे हे रोज असंच सुरू राहिलं. नवऱ्याला हॉट मुलीसोबत नाचताना पाहून बायकोची सटकली; दिला चोप, पाहा Video गेल्या वर्षी 3 मार्च रोजी कमिलाने डॅनियलवर चाकूने हल्ला केला. तिने त्याचा जीवच घेतला. याआधीही तिने अनेकदा त्याच्यावर हल्ले केले होते. डॅनियलची आई स्टेसीच्या म्हणण्यानुसार, ‘त्याच्या मानेवर ब्लेडने कापल्याच्या अनेक खुणा होत्या. जेव्हा मी त्याला विचारायचे तेव्हा तो अपघात झाल्याचं सांगून टाळत असे. कमिला वारंवार आत्महत्येची धमकी देत ​​असे. यामुळे डॅनियल घाबरायचा. बदनामीची भीती त्याला सतावत होती.’ डॅनियलची आई म्हणाली, ‘माझा मुलगा असा मरणारा नव्हता. मला त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसलं. पण मी चुकीचा अंदाज बांधला होता. मला वाटलं की कदाचित सर्व काही ठीक होईल. पण या मुलीने माझ्या मुलाचा जीव घेतला.’ आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षात ती दररोज त्याच्या कबरीला जात असे. या महिन्यात क्रॉयडन क्राउन कोर्टाने कामिलाला डॅनियलची हत्या आणि तिच्या माजी प्रियकरावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कामिलाचे बालपण खूप संकटात गेले. तिचे वडील वारंवार आईला शिवीगाळ करायचे. तेव्हापासून ती निर्भय झाली होती. जेव्हा ती डॅनियलला भेटली, तेव्हाही तिच्यावर दरोडा आणि ब्लेड बाळगणे यासारख्या गुन्ह्यांसाठी खटला चालवला जात होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या