पीडित चिमुरडीच्या घराशेजारीच राहणाऱ्या रोशन ददेल 23 वर्षीय तरुणाने हे कृत्य केले आहे.
लखनऊ 02 ऑगस्ट : सोशल मीडिया क्राईम (Social Media Crime) आणि प्रेमात धोका दिल्याचं एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत रुग्णालयात भर्ती असलेल्या तरुणीनं आपल्या प्रियकरावर आणि त्याच्या मित्रांवर ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचा आरोप केला आहे. युवतीनं या सर्वाला कंटाळून जीव देण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केला आहे. यात तिला गंभीर दुखापत झाली आहे, मात्र सुदैवानं तिचा जीव वाचला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुरादाबाद येथील आहे. अवघ्या 50 रुपयांवरून झालं मित्रांमध्ये भांडण आणि चाकूनं हल्ला; नेमकं घडलं काय? तरुणीनं सांगितलं, की आरोपी प्रियकर शादाब याच्यासोबत तिची काही दिवसांपूर्वी मैत्री झाली होती. शादाबनं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगत तिला प्रपोज केलं आणि हे नातं मैत्रीवरुन प्रेमात रुपांतरित झालं. यानंतर शादाब दोघांचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले आणि आता ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो देत आहे. युवतीनं सांगितलं, की हे फोटो आणि व्हिडिओ आरोपीनं त्याच्या मित्रांनाही पाठवले. पुणे: भरदिवसा 24 वर्षीय कुख्यात गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी घालून केली हत्या ही गोष्ट तरुणीच्या घरापर्यंतही पोहोचली. यानंतर तिनं पोलिसांत तक्रार करत आरोप केला, की शादाबनं तिला म्हटलं, की माझ्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेव अन्यथा 50 हजार रुपये दे. असं न केल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. यानंतर तरुणीनं पाण्यात उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. तरुणीनं आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शादाब, आरिफ, सद्दाम आणि राशिद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.