मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अवघ्या 50 रुपयांवरून झालं मित्रांमध्ये भांडण आणि चाकूनं हल्ला; नेमकं घडलं तरी काय?

अवघ्या 50 रुपयांवरून झालं मित्रांमध्ये भांडण आणि चाकूनं हल्ला; नेमकं घडलं तरी काय?

तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: आजकाल क्षुल्लक वादही मोठ्या भांडणाचं रूप घेतो. यामुळे अनेक गुन्हे (Crime News) घडतात. अशीच एक घटना नवी दिल्लीमध्ये घडली आहे. ही घटना 24 जुलै रोजी घडली जेव्हा संदीप आणि ओम बिंदापूर येथे त्यांच्या अल्पवयीन मित्राला भेटण्यासाठी गेले होते. अल्पवयीन मित्राने दारू खरेदी करण्यासाठी 50 रुपये मागितले, पण संदीपने त्याला पैसे देण्यास नकार दिला.

याचा राग येऊन अल्पवयीनाने संदीप आणि ओमवर चाकूने हल्ला केला. जेव्हा चाकू आणि धातूचा भाग त्याच्या स्नायूंमध्ये अडकला. तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

हे वाचा - ...अन् 26 दिवसानंतर उलगडलं त्या चिमुकल्याच्या मृत्यूचं रहस्य; अंगावर येईल काटा

पोलीस उपायुक्त (द्वारका) संतोषकुमार मीणा यांनी सांगितले की, आरोपी चोरी आणि लूटमारीसह इतर पाच प्रकरणात वॉन्टेड आहे. बुधवारी त्याला पकडण्यात आले आणि बालसुधारगृहात पाठवण्यात आले. त्याच्या इतर दोन साथीदारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, चाकूच्या हल्ल्यात संदीप जखमी झाला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याचा मित्र ओमला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news