JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Pune News: शेजाऱ्याच्या घरी गेलेल्या चिमुकलीसोबत घडलं धक्कादायक, शिक्षिकेमुळे 4 वर्षांनी उघड झाली घटना

Pune News: शेजाऱ्याच्या घरी गेलेल्या चिमुकलीसोबत घडलं धक्कादायक, शिक्षिकेमुळे 4 वर्षांनी उघड झाली घटना

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती लहान असताना एकदा खेळत होती. तेव्हा शेजारच्या घराच्या खिडकीतून काहीतरी वस्तू पडली. ही पडलेली वस्तू परत देण्यासाठी मुलगी शेजारच्या घरी गेली

जाहिरात

पुण्यातील मुलीसोबत घडली धक्कादायक घटना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 02 जून : शाळेत समुपदेशन सुरू असताना एका विद्यार्थिनीने शिक्षिकेला आपल्यासोबत झालेल्या सामूहिक बलात्काराबद्दल सांगितलं. चार वर्षांपूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्ना नदाफ आणि इतर दोन जणांवर बलात्कारांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनीही मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती लहान असताना एकदा खेळत होती. तेव्हा शेजारच्या घराच्या खिडकीतून काहीतरी वस्तू पडली. ही पडलेली वस्तू परत देण्यासाठी मुलगी शेजारच्या घरी गेली. यावेळी मुन्ना नदाफने तिला आत ओढत दरवाजा लावून घेतला. यानंतर त्याने चिमुकलीवर बलात्कार केला. तर इतर दोघांनी तिचे हात पकडले. आरिफने मी अभय असल्याचं सांगत विवाहित तरुणीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, सत्य समोर येताच बसला जोरदार धक्का मुलीच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी मोठ्या आवाजात गाणी लावली आणि तिचं तोंडही दाबलं. मुन्ना नंतर तिथे असलेल्या इतर दोघांनीही तिच्या बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिला धमकी दिली की, याबद्दल कोणालाही सांगितल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना त्रास देऊन त्यांचे हाल करू. यामुळे घाबरलेल्या मुलीने चार वर्ष याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं नाही. अखेर चार वर्षांनंतर तिने हा प्रकार आपल्या शिक्षिका मुस्तफ हुसैन यांना सांगितला. यानंतर आता याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या