JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Crime News: राजूर घाटात पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार; माहिती मिळूनही पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाही, अन्..

Crime News: राजूर घाटात पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार; माहिती मिळूनही पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाही, अन्..

महिलेवर बलात्कार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही तब्बल चार तास पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही.

जाहिरात

पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा 14 जुलै : जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बुलडाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात नातेवाईकांसोबत फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर सहा ते सात जणांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं आहे. महिलेवर बलात्कार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही तब्बल चार तास पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही. पुण्यात चाललंय काय? शाळेतच 12 वर्षीय मुलाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार यात कारणामुळे आमदार संजय गायकवाड अत्यंत आक्रमक झाले आहेत. गेल्या दीड महिन्यात या राजूर घाटात तब्बल सहा ते सात सामूहिक बलात्कार झाले असल्याचंही गायकवाड म्हणाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील राजूर घाटात फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांवर, मुलींवर बाहेरून आलेली टोळकी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून बलात्कार करत असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजूर घाटात महिलेवर 6 ते 7 जणांचा सामूहिक बलात्कार केला. मात्र पोलिसांना माहिती मिळूनही पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचले नाहीत ..अशात आता जोपर्यंत या गुन्हेगारांवर बलात्काराच्या स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नाही, अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे. या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या