JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / वसईतील बिअर बारमध्ये वेटर आणि ग्राहकाची फ्री-स्टाईल हाणामारी; VIDEO आला समोर

वसईतील बिअर बारमध्ये वेटर आणि ग्राहकाची फ्री-स्टाईल हाणामारी; VIDEO आला समोर

ही घटना वसईच्या लक्ष्मी बारमधील आहे. यात मद्यधुंद व्यक्तीने वेटरसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पुढे हा वाद जास्तच वाढला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय देसाई, प्रतिनिधी पालघर 17 जून : वसईतील एका बिअर बारमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात रस्त्यावरच काही लोकंची हाणामारी चाललेली दिसते. वसईच्या या बिअर बारमध्ये बिअर पिण्यावरून वाद सुरू झाला आणि काहीच वेळात त्याचं रूपांतर हाणामारीत झालं (Fighting in Beer Bar). अगदी चित्रिपटाला शोभेल अशी हाणामारी बारसमोरील रस्त्यावर सुरू झाली. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) तिथे उभा असलेल्या कोणीतरी शूट केला. जो आता व्हायरल झाला आहे. ‘तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता’ म्हणत लेकाने बापावर केले कोयत्याने 10 वार, बीडमधील घटना ही घटना वसईच्या लक्ष्मी बारमधील आहे. यात मद्यधुंद व्यक्तीने वेटरसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पुढे हा वाद जास्तच वाढला. यानंतर या मद्यधुंद व्यक्तीला बारमधून बाहेर काढण्यात आलं. मात्र तरीही तो शांत बसला नाही आणि वाद वाढतच राहिला.

संबंधित बातम्या

अखेर या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. 75 वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला, महिलेच्या अंगावर पडले तब्बल 56 टाके मद्यधुंद व्यक्ती समजावूनही ऐकत नसल्याचं पाहून वेटरही भडकला. यानंतर वेटरने या व्यक्तीला धू-धू धुतलं. बारसमोर असलेल्या रस्त्यावरच ही हाणामारी सुरू झाली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरच काही लोकांच्या गटाने एका व्यक्तीला घेरलं आहे आणि त्याला मारहाण केली जात आहे. हे लोक या व्यक्तीला रस्त्यावरुन खेचत बारजवळ आणतात. भररस्त्यात लागलेली ही भांडणं बघण्यासाठी नागरिकांनीही आजूबाजूला भरपूर गर्दी केलेली दिसती. यातील काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या