चार जणांचा मृत्यू
गोंदिया, 28 जून, रवी सपाटे : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीमध्ये पाण्याची मोटर टाकत असताना शॉक लागून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तिरोडा तालुक्यातील सरांडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सचिन गिरधारी साठवणे, सचिन भोंगाळे, प्रकाश भोंगाळे आणि महेंद्र राऊत अशी मृतांची नावं आहेत. एकाच वेळी गावातील चार जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. नेमकं काय घडलं? घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सचिन गिरधारी साठवणे हे आपल्या विहीरीत विद्युत मोटर टाकत होते. त्यावेळी त्यांना शॉक लागला, आणि ते विहिरीत कोसळले. त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेले सचिन भोंगाळे आणि प्रकाश भोंगाळे या काका पुतण्याचा देखील विहीरीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर विहिरीजवळ सुरू असलेला आरडाओरडा एकूण शेजारीच असलेल्या महेंद्र राऊत यांनी विहिरीकडे धाव घेतली. ते त्या तिघांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले मात्र त्यानाही विजेचा धक्का लागला. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाला आहे. धक्कादायक! ..म्हणून पतीनं सोशल मीडियावर पोस्ट केले आपल्याच पत्नीचे खासगी व्हिडीओ, गोंदियातील प्रकारानं खळबळ गावावर शोककळा एकाच गावातील चार जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. गावावर शोककळा पसरली आहे. शॉक लागून या चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या विहीरीमध्ये गॅस आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे.