JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / आधी फ्लॅटवर बोलावलं, सोबत फोटो काढला अन् नंतर..., पुणेकर व्यापाऱ्यासोबत घडलं भयंकर

आधी फ्लॅटवर बोलावलं, सोबत फोटो काढला अन् नंतर..., पुणेकर व्यापाऱ्यासोबत घडलं भयंकर

पुण्यात व्यापाऱ्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 31 मार्च : काही दिवसांपूर्वी पुण्यात सेक्सटॉर्शनला बळी पडून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात हडपसर मध्ये हनीट्रॅपचा वापर करून व्यावसायिकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक महिला आणि एका वकिलाला अटक केली आहे. विक्रम भट असे वकिलाच नाव असून निधी दीक्षीत या 25 वर्षीय महिलेला ही अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं -  व्यावसायिक असलेल्या मगरपट्टा परिसरात राहणाऱ्या व्यक्तींशी ओळख वाढवून त्याच्याशी लगेच करून त्याला फ्लॅटवर बोलवून निधी दीक्षीत या महिलेने काही फोटो काढले. तसेच यानंतर विक्रम भट या वकिलाच्या मदतीने लोणीकीळभोर पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दिली. इतकेच नव्हे तर ती मागे घेण्यासाठी वेळोवेळी लाखो रूपये घेऊन तब्बल 18 लाख रूपये उकळले. या संदर्भात फिर्यादीने शेवटी पैशांच्या मागणीला वैतागून हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली आणि चौकशीनंतर या जोडीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पतीसोबत झाला वाद अन् समोरून रेल्वे येताच तीन मुलांसह उचललं टोकाचं पाऊल पुण्यात 64 वर्षांचे आजोबा सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; व्हिडीओ कॉल करुन..  व्हॉट्सअ‍ॅपवरुन एका अनोळखी महिलेसोबत झालेल्या ओळखीतून त्याचा न्यूड व्हिडीओ शूट करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणाने हे पाऊल उचललं. या घटनेनंतर आणखी एक घटना आता समोर आली आहे. शहरातील एका 64 वर्षीय वृद्धाला न्यूड व्हिडीओ कॉल करुन न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले आहेत.

पीडित वृद्ध घरी असताना अनोळखी नंबरवरुन व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल आला. त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवत न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा व्हिडीओ रेकॉर्ड करुन व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी 4 लाख 66 हजार रुपये घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या