रवी सपाटे, प्रतिनिधी. गोंदिया 04 ऑगस्ट : जमिनीच्या वादातून अनेकदा शेजाऱ्यांसोबत किंवा अगदी घरातीलच लोकांसोबत भांडण झाल्याच्या घटना तुमही अनेकदा पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, अनेकदा ही भांडणं अगदी टोकाला पोहोचतात. अशीच काहीशी घटना गोंदियामध्येही पाहायला मिळाली. यात जमिनीच्या वादातून भावकीमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर काहीच वेळात हाणामारीत झालं. महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रकवर जमावाचा हल्ला, मध्य प्रदेशात मॉब लिंचिंग, एकाचा मृत्यू जमिनीच्या वादातून भावकीत झालेल्या भांडणात लोकांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना गोंदिया तालुक्यात घडली. या मारहाणीत तीन लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.
हा व्हिडिओ गोंदिया तालुक्यातील तुमखेड़ा येथील आहेत. घटनेत नागपुरे कुटुंबात शेत जमिनीवरुन वाद झाला. या वादाचे रूपांतर काहीच वेळात हाणामारीत झालं आणि एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या घटनेत एक जण गंभीर जखमी असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर प्रेम, नंतर धोका, अल्पवयीन मुलीची तीनवेळा विक्री; कशी फुटली अत्याचाराला वाचा हा वाद सुरू असताना शेजारीच उभा असलेल्या व्यक्तीने संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. यात काही महिला आणि पुरुष आपसात भांडत आहेत. मात्र, इतक्यात यातील एक व्यक्ती दुसऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करतो. यानंतर हा वाद जास्तच चिघळतो. घटनेचा व्हिडिओ विचलित करणारा आहे.