JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / पैशांची लालसा महिला शिक्षिकेला भोवली, केलं हे कृत्य अन् गमावली सरकारी नोकरी

पैशांची लालसा महिला शिक्षिकेला भोवली, केलं हे कृत्य अन् गमावली सरकारी नोकरी

एका शिक्षिकेने धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 27 फेब्रुवारी : विद्यार्थ्यांवर संस्कार करणारं व्यक्तिमत्त्व म्हणून शिक्षकांकडे पाहिलं जातं. त्यांच्या प्रत्येक कृतीकडे मुलांचं तर लक्ष असतंच; पण समाजही त्यांच्याकडे आदरयुक्त भावनेतून पाहत असतो. मात्र, त्यांच्याकडून काही चुकीचं घडलं, की त्यांच्याबद्दलचा आदर एकदम कमी होतो. अशीच एक घटना राजस्थानात जयपूरमध्ये घडली आहे. राजस्थानात प्रथम श्रेणी शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला पैशांच्या लालसेपोटी सरकारी नोकरी गमवावी लागली आहे. शिवाय सध्या ती तुरुंगवासात आहे. नेमकं काय घडलंय, हे जाणून घेऊ या. ‘एशियानेटन्यूज’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. राजस्थानात 25 फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत तृतीय श्रेणी शिक्षक भरती परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी संगीता बिश्नोई जयपूरच्या एका परीक्षा केंद्रावर पोहोचली. ती जालौर जिल्ह्यातल्या रानीवाडा तालुक्यातली रहिवासी आहे. जालौरमध्येच ती प्रथम श्रेणी शिक्षिका म्हणून कार्यरत असून, तिचे पती नरेश बिश्नोईदेखील सरकारी शिक्षकच आहेत. संगीता परीक्षा देण्यासाठी आली होती खरी; पण स्वतःसाठी नव्हे, तर तिच्या मंजू नावाच्या एका मैत्रिणीसाठी. मंजूदेखील जालौरमधलीच असून, तीही सरकारी शिक्षिकाच आहे. तिला प्रमोशन हवं होतं; म्हणून ती भरती परीक्षेला बसली होती. मंजूने त्या परीक्षेआधीची रीट परीक्षा उत्तीर्ण केली होती; मात्र मुख्य परीक्षेसाठी तिची तयारी झाली नव्हती. म्हणून मंजूने संगीताशी संपर्क साधून तिला आपल्याऐवजी डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसायला सांगितलं. त्यासाठी तिला 10-15 लाख रुपये देण्याची तयारीही दर्शवली. तिच्यासाठी खोटी कागदपत्रंही स्वतःच करून देणार असल्याचं मंजूने सांगितलं. रात्री 12 वा. मेसेज, प्रेयसीसोबत शरीरसंबंध; तेवढ्यात काकाचा फोन आला अन्… संगीताने मैत्रिणीचा हा प्रस्ताव स्वीकारला आणि परीक्षेची तयारी सुरू केली. जयपूरमध्ये ती परीक्षा केंद्रावर पोहोचली, तेव्हा तिची कागदपत्रं तपासण्यात आली; मात्र कागदपत्रं संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी तिला परीक्षा देऊ दिली नाही. नंतर तिची चौकशी करण्यात आली, तेव्हा सुरुवातीलाच संगीताचं बिंग फुटलं. तिच्या पतीलाही पाचारण करण्यात आलं. नंतर तिला अटक करण्यात आली. सध्या ती जयपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. तिला किमान तीन महिने तरी जामीन मिळणार नाही, अशी कागदपत्रं पोलिसांकडे असल्याचं समजतं. महिन्याला 50 हजार रुपये पगार असलेली सरकारी नोकरी या शिक्षिकेने थोड्या पैशांसाठी पणाला लावली आणि स्वतःची प्रतिमाही खराब करून घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या