JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / बापाने लेकीला 25 वेळा सुऱ्याने भोसकलं, पत्नीही जखमी; दिल्लीनंतर आणखी एक भयानक Video

बापाने लेकीला 25 वेळा सुऱ्याने भोसकलं, पत्नीही जखमी; दिल्लीनंतर आणखी एक भयानक Video

नेमकं असं काय घडलं की, एका बापाने आपल्या लेकीची इतक्या निघृणपणे हत्या केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सूरत, 31 मे : बहुचर्चित दिल्लीतील शाहबाद डेअरी हत्याकांडांचा भयानक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता गुजरातमधील सुरत येथून एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक वडील आपल्या 19 वर्षीय लेकीची अत्यंत निघृणपणे हत्या करीत असल्याचं दिसून येत आहे. नराधम वडिलांनी पोटच्या लेकीवर 25 वेळा सुऱ्याने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. असं नेमकं काय घडलं की, एका बापाने आपल्या लेकीची इतक्या निघृणपणे हत्या केली. गच्चीवर झोपण्यावरुन सुरू झाला वाद… आरोपीचं नाव रामानुज साहू असून ते आपल्या कुटुंबासह सुरत येथील सत्य नगर सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होते. रामानुज आणि त्यांच्या पत्नीमध्ये मुलगी रात्रीच्या वेळी गच्चीवर झोपण्यावरुन वाद झाला. रात्री साधारण 11.20 वाजता वादाचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात वडील पत्नीसमोर मुलीवर हल्ला करतात. तब्बल 25 वेळा बापाने मुलीवर क्रूरपणे वार केले. यावेळी मुलगी गंभीर जखमी झाली. यावेळी आईने मुलीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र नराधम बाप कोणाचंही ऐकत नव्हता. यावेळी मुलगी स्वत:चा बचाव करण्यासाठी धावत दुसऱ्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र वडिलांनी तिला पकडलं आणि तिच्यावर सलग चाकूने वार केले. आपल्या मुलीवर क्रूर हल्ला केल्यानंतरही रामानुज थांबले नाही, यानंतर त्यांनी आपल्या पत्नीवरही हल्ला केला. तिच्यावरही 10 वेळेस वार केले आणि तिची बोटंही कापली. Crime News : मटणासाठी मित्रानेच मित्राला संपवलं; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकारानं खळबळ या प्रकरणात पोलिसांनी मिल मजूर साहू यांना अटक केली आहे. मुलांनी सांगितलं की, आईची बोटं कापण्यात आली. बोटं जोडण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती अद्यापही रूग्णालयात उपचार घेत आहे. सूरतच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टाइल्सवरील डाग काढून टाकण्यासाठी, प्रथम थोडेसे रॉक सॉल्ट घ्या. नंतर त्यात एका लिंबाचा रस घेऊन त्यात एक चमचा वॉशिंग पावडर टाकून चांगले मिसळा. नंतर त्यात अर्धा चमचा सोडा घाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या