JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आधी डोळे काढले, मग त्याची राख करून...; बापानंच निर्घृणपणे केली 8 वर्षीय मुलीची हत्या, कारण ऐकून बसेल धक्का

आधी डोळे काढले, मग त्याची राख करून...; बापानंच निर्घृणपणे केली 8 वर्षीय मुलीची हत्या, कारण ऐकून बसेल धक्का

तिची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर तिचा एक डोळा काढून खगडिया येथे घेऊन गेले. यानंतर हा डोळा जाळून त्याच्या राखेचं ताईत बनवलं गेलं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 10 ऑगस्ट : एक अत्यंत हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह वाईट अवस्थेत आढळल्यानंतर पोलिसांनी जो खुलासा केला तो हैराण करणारा आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे, की अंधश्रद्धेतून या चिमुकलीची हत्या (Murder of Minor Girl) झाली आहे आणि तिचे डोळे काढून यापासून ताईत बनवण्यात आलं आहे. ही घटना बिहारच्या (Bihar Crime) मुंगेर जिल्ह्यातील सफियाबाद ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. मुंगेरचे एसपी जे. जे रेड्डी यांनी जे सांगितलं, ते हैराण करणारं आहे. ते म्हणाले, की रामनगरच्या पदम गावात राहणाऱ्या दिलीप कुमारनं पाचव्या मुलाच्या इच्छेपोटी हे क्रूर पाऊल उचललं (Father Killed his Daughter) आहे. पोलिसांनी (Bihar Police) दिलेल्या माहितीनुसार, दिलीपच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. यावेळी दिलीपला कोणत्याही परिस्थितीत पत्नीचा गर्भपात होऊ द्यायचा नव्हता. यामुळे त्यानं हे सर्व आपला मित्र दशरथ आणि तनवीरला सांगितलं. तनवीरनं खगडियाच्या मधुरा गावातील रहिवासी असलेल्या परवेज आलम याच्यासोबत दिलीपचा संपर्क करून दिला. परवेजनं गर्भपात टाळण्यासाठी एका मुलीचे डोळे काढून त्याचं ताईट बनवून पत्नीला घालण्याचा सल्ला दिला. भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची गोळी घालून हत्या; दहशतवादी हल्ल्यानंतर खळबळ बुधवारी सफियाबाद ठाण्याच्या क्षेत्रात आठ वर्षीय चिमुकली जेव्हा गंगेच्या किनाऱ्यावरुन आपल्या वडिलांसोबत घर परतत होती, तेव्हाच दिलीप, दशरथ आणि तनवीर या चिमुकलीला आपल्यासोबत घेऊन गेले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर तिचा एक डोळा काढून खगडिया येथे घेऊन गेले. यानंतर हा डोळा जाळून त्याच्या राखेचं ताईत बनवलं गेलं. हे ताईत दिलीपच्या पत्नीला घातलं. याप्रकरणी परवेजसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोबाइल नंबर बंद असतानाही बँक खात्यातून 16 लाख लंपास; प्लानिंग पाहून पोलिस हैराण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सफियाबाद ठाण्याच्या क्षेत्रात एका मुलीच्या मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला. या मुलीचा डोळा काढला असल्याचं यावेळी निदर्शनास आलं. इतकंच नाही तर तिच्या हाताच्या बोटांवरही जखमा आढळल्या. कुटुंबीय बलात्काराचा संशय व्यक्त करत होते, मात्र शवविच्छेदन रिपोर्टमध्ये असं काहीही आढळून आलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या