जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अनंतनाग : भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची गोळी घालून हत्या; दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ

अनंतनाग : भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची गोळी घालून हत्या; दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ

अनंतनाग : भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची गोळी घालून हत्या; दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ

Jammu-Kashmir News : या भ्याड हल्ल्याचा देशभरातून विरोध केला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 9 ऑगस्ट : काश्मीरमधील (Jammu-Kashmir News) दक्षिण भागातील अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौकात आज (9 ऑगस्ट) भाजप नेता आणि त्यांची पत्नी यांना गोळी घालून हत्या करण्यात आली. मृतांची ओळख गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी जवाहिरा यांच्या रुपात झाली आहे. दोघेही पंचायतीचे सदस्य होते. पोलिसांचं म्हणणं आहे की, या हत्येचा कट लश्कर-ए-तोयबाने यांनी आखला आहे. उपराज्यपालांनी हत्येचा निषेध केला असून लवकरत दोषींना परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल चौकातील अनंतनागमध्ये रेडवानी कुलगाममध्ये सरपंच असलेले भाजप नेता गुलाम रसूल डार यांच्या भाड्याच्या घरात बंदुकधारी घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. डार आणि त्यांची पत्नी जवाहिरा दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीएमसी अनंतनाग येथे नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (BJP leader and his wife shot dead Sensation across the country after the terrorist attack) हे ही वाचा- गावकऱ्यांनी ‘तो’ पाकिस्तानी ड्रोन पाहिला आणि…. 15 ऑगस्टला होती घातपाताची योजना पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी घटनास्थळी दौरा केला. यावेळी ते म्हणाले की, भाजप सरपंच आणि त्यांची पत्नी आतापर्यंत एका सुरक्षित हॉटेलमध्ये राहत होते. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांना घरी राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की, हल्ल्यामागे लश्कर-ए-तोयबाचा हात होता. ज्यात रेडवानी कुलमामचे गुलाब डार आणि एक पंच त्यांची पत्नी जवाहिरा यांचा मृत्यू झाला. भाजप प्रवक्ता अल्ताफ ठाकूर यांनी भाजप नेत्याची क्रूर पद्धतीने केलेल्या हत्येचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, डार हे केवळ पंचायतीशी संबंधित नव्हते, तर ते भारत जनता पार्टीच्या शेतकरी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते. याशिवाय पीडीपी अध्यक्ष महबुबा मुफ्ती यांनीही हत्येचा निषेध व्यक्त केला आहे. यापूर्वीदेखील असे अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आले आहे. यामध्ये नेत्यांचा जीव गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात