पालघर 31 जुलै : विरारमध्ये जन्मदात्या बापानेच आपल्या 3 वर्षाच्या मुलाला जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विरार पूर्वेच्या जीवदानी पाडा परिसरात ही घटना घडली आहे. मात्र, मुलगा आजारी होता आणि त्यात त्याचा आधीच मृत्यू झाल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलें आहे. निकेश वाघ असं या मयत चिमुकल्याचं नाव असून गणेश वाघ असं त्याच्या वडिलांचं तर दीपिका वाघ असं आईचं नाव आहे. हे कुटुंब मोलमजुरी करत असून जीवदानी पाडा परिसरात वास्तव्यास आहे. 13 वर्षीय मुलीने शाळेच्या तक्रार पेटीत केला बापाच्या कृत्याचा भांडाफोड; पत्र वाचून शिक्षक Shocked! मिळालेल्या माहितीनुसार, निकेश या चिमुकल्याचा दोन दिवसांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगत त्याच्या वडिलांनी रात्रीच्या अंधारात एका झोपडीच्या शेजारी निकेशचा मृतदेह खड्डा करून पुरला होता. काही नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती विरार पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी घटनास्थळी पोहोचून कुदळ आणि फावड्याने खड्डा करून पुरलेला मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो ताब्यात घेत शवविच्छेदन अहवालासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे.. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चिमुकल्याचा मृत्यू हा आजारपणामुळे झाला असल्याची माहिती त्याच्या वडिलांकडून मिळत आहे. मात्र या चिमुकल्याचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याची हत्या तर करण्यात आली नाही ना? याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. कॉलेजने आखला विद्यार्थ्यांसह रायरेश्वरावर ट्रेकिंगचा प्लान; रस्त्यातच 17 वर्षीय शुभमचा हार्ट अटॅकने दुर्देवी मृत्यू दरम्यान विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितलं की मुलाच्या वडिलांनी या मुलाचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याचं सांगितलं आहे. तो मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला असून अहवाल आल्यावर हत्या की नैसर्गिक मृत्यू हे स्पष्ट होईल.