मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

13 वर्षीय मुलीने शाळेच्या तक्रार पेटीत केला बापाच्या कृत्याचा भांडाफोड; पत्र वाचून शिक्षक Shocked!

13 वर्षीय मुलीने शाळेच्या तक्रार पेटीत केला बापाच्या कृत्याचा भांडाफोड; पत्र वाचून शिक्षक Shocked!

वडिलांच्या छत्रछायेत मुलीला नेहमीच सुरक्षित वाटतं. मात्र हाच बाप नराधम निघाला.

वडिलांच्या छत्रछायेत मुलीला नेहमीच सुरक्षित वाटतं. मात्र हाच बाप नराधम निघाला.

वडिलांच्या छत्रछायेत मुलीला नेहमीच सुरक्षित वाटतं. मात्र हाच बाप नराधम निघाला.

  • Published by:  Meenal Gangurde

बूंदी, 30 जुलै : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा लज्जास्पद घटना समोर आली आहे. वडिलांच्या छत्रछायेत मुलीला नेहमीच सुरक्षित वाटतं. मात्र हाच बाप नराधम निघाला. येथील एका गावातील बाप आपल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या 2 वर्षांपासून बलात्कार करीत होता. बदनामी आणि बापाच्या भीतीने तिने कोणालाच याबाबत सांगितलं नाही.

जेव्हा याचा अतिरेक झाला तेव्हा तिने शाळेच्या प्रशासकांकडे आपली व्यथा सांगितली. ज्यानंतर शाळेतील प्रशासनाने याबाबतची माहिती कुटुंबीय आणि पोलिसांना दिली. त्याच्या आधारावर पोलीस या प्रकरणात तपास सुरू करीत आहे.

लेटरमुळे गूढ उघड..

13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने बलात्कार केल्याचा खुलासा शाळेतील तक्रार पेटीवरुन झाला. शाळेत विद्यार्थ्यांची समस्या आणि तक्रारीसाठी गुप्तपणे एक पेटी ठेवण्यात आली आहे. मुलीने बापाबद्दलचा खुलासा या पेटीतून केला. तिने लिहिलं आहे की, गेल्या दोन वर्षांपासून बाप त्याच्यासोबत घाणेरणं कृत्य करीत होता. 25 जुलै रोजीही तिच्यासोबत जबरदस्ती करण्यात आली होती. विरोध केल्यामुळे तो तिला मारहाण करीत होता. जेव्हा शाळेतील व्यवस्थापकांनी ते पत्र वाचलं तर त्यांना धक्काच बसला.

काकीला बोलावून दाखवलं पत्र...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार पेटीतील पत्र वाचल्यानंतर प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. ज्यानंतर अल्पवयीन मुलीच्या काकीला शाळेत बोलावलं. त्यांनी पत्र दाखवून वडिलांनाच्या कृत्याबद्दल सांगितलं. यानंतर कुटुंबीय अल्पवयीन पोलीस ठाण्यात गेले. येथे आरोपी वडिलांच्या विरोधात तक्रार केली.

12 वर्षांपूर्वी आईचा मृत्यू, फरार झाला आरोपी वडील...

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा मृत्यू 12 वर्षांपूर्वी झाला होता. आजारातून त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून मुलगी बाबासोबत राहत होती. गेल्या दोन वर्षांपासून ती वडिलांसोबत राहत होती. वडिलांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime news, Father, Rape