इटली 21 डिसेंबर : इटलीमध्ये नुकतंच एक फेक स्त्रीरोग तज्ज्ञाचं (Fake Gynecologist) धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोप आहे की त्याने वेबकॅमच्या (Webcam) माध्यमातून शेकडो महिलांची वजायनल टेस्ट (Vaginal Test) केली. त्याच्यावर 400 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी छापा मारून या डॉक्टरला अटक केली. अनेक महिलांच्या तक्रारीनंतर त्याच्याकडून बरेच स्मार्टफोन आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचे कॉल वायरटॅपिंग केले. पत्नीला मुलगी मानायचा म्हणून 4 जणांनी मिळून काढला मानलेल्या बापाचा काटा आणि… या प्रकरणाबाबत बोलताना पोलिसांनी सांगितलं की या व्यक्तीने त्या महिलांना आपलं लक्ष्य बनवलं ज्यांचं संपूर्ण देशातील क्लिनिकमध्ये स्वॅब झालं होतं. त्याने या महिलांना एक ऑनलाईन स्त्रीरोग संबंधीची टेस्ट करण्यासाठी तयार केलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की लाजियोपासून लोम्बार्डिया आणि कॅलाब्रियापासून संपूर्ण इटलीतील 400 हून अधिक महिलांना त्याने लक्ष्य केलं. रिपब्लिका डेलीसोबत बोलताना एका पीडितेनं सांगितलं की आरोपीनं आपण एक डॉक्टर असल्याचं सांगितलं. त्याला या महिलांची जन्मतारीख आणि जन्मस्थान माहिती असायचं. त्याने या महिलेला विचारलं की तुम्ही काही महिन्यांपूर्वी स्त्रीरोगासंबंधी तपासणी केली आहे का. तसंच तिला खासगी प्रश्न विचारले. यानंतर झूमच्या माध्यमातून एक व्हिडिओ कॉल केला. यानंतर त्याने या महिलेला आपला प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास सांगितलं. अकलेचा दुष्काळ! YouTube Video पाहून घरीच पत्नीची डिलिव्हरी, बाळाचा मृत्यू सॅलेंटोमधील 24 वर्षाच्या तरुणीने पहिल्यांदा याबाबत तक्रार दिली. तिने असा दावा केला की जेव्हा तिने व्हिडिओ अपॉइंटमेंटची व्यवस्थी केली तेव्हा आरोपीला तिच्याबद्दल सर्वकाही माहिती होतं. व्हिडिओ कॉलवरच त्याने तरुणीला आपले कपडे काढण्यास सांगितलं. मात्र काहीतरी गडबड असल्याचं जाणवताच ही तरुणी थांबली. मात्र, शेकडो महिला या फेक डॉक्टरच्या जाळ्यात अडकल्या.