उल्हासनगर, 20 डिसेंबर : उल्हासनगरमध्ये (ullhasnagar) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ एका इसमाची हत्या (murder) करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, आपल्या पत्नीला मुलगी मानतो म्हणून चार जणांनी मिळून ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद श्रीहरी तेलगु उर्फ शेट्टी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आरोपी रवी गांजगी आणि जब्बार यांनी तीक्ष्ण हत्याराने शेट्टीची हत्या केली. आरोपी रवीच्या पत्नीला मृत आनंद हा मुलगी मानायचा. त्यामुळे त्याचे घरी येणे जाणे होते. मात्र यामुळे आरोपी रवी आणि त्याच्या पत्नी वाद होते. आपल्या भांडणात आनंद कारणीभूत आहे, असं रवीला वाटायचे म्हणून त्याने आणि त्याच्या मित्राने त्याची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली. तर रवी गांजगी आणि जफ्फर अली अजगर हसन मोमीन असे फरार आरोपींची नावे आहे. महत्वाचे म्हणजे, या हत्येत मुख्य आरोपी रवीच्या सोबत दोन महिलांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी दोन महिलांना उल्हासनगर मधूनच ताब्यात घेऊन अटक केली आहे. या हत्येत ज्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. राणी गांजगी (वय ३६) अमिना हसन मोमीन (वय ३२) असं या दोन महिलांची नावे आहेत. मात्र मुख्य दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या शोधात पोलिसांची पथके रवाना केले आहेत. शिवाय फरार आरोपी सराईत गुन्हेगार असून 2018 मध्ये तडीपारही करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर झोनचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे. तर अटक आरोपी महिलांना आज न्यायालयात हजर केले असता २४ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ही हत्या नेमकी कशामुळे झाली हे मुख्य दोघे आरोपी अटक झाल्यानंतरच समोर येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.