JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / अनैतिक संबंधातून पतीसोबत भयानक कांड; बायको, प्रियकराने आधी पाजली दारू अन...

अनैतिक संबंधातून पतीसोबत भयानक कांड; बायको, प्रियकराने आधी पाजली दारू अन...

अनैतिक संबंधातून धक्कादायक पत्नीने पतीसोबत कृत्य केले.

जाहिरात

अटक करण्यात आलेले आरोपी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंडीगढ, 23 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस अनैतिक संबंधांचे प्रकार समोर येत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहेत. त्यातूनच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. चंदीगड येथील इंडस्ट्रियल एरिया फेज 2, सेक्टर 19, पंचकुलाच्या एका रिकाम्या प्लॉटमध्ये शिव कुमार नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्या शरीरावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पंचकुला पोलीस आणि गुन्हे शाखा 26च्या पथकाने केलेल्या तपासानंतर मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पत्नीचे एका व्यक्तीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मृत शिवकुमारची हत्या केल्याचा खुलासा झाला आहे. या अनैतिक संबंधामुळे मृत पत्नीच्या प्रियकराने शिवकुमारला दारू पाजून चाकूने भोसकून खून केला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पंचकुलाच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. रिसेप्शनच्या दिवशी वरमुलाने केली वधूची हत्या, दोन दिवसांपूर्वीच केले होतं Love Marriage पंचकुला सेक्टर 19 चे पोलीस तपास अधिकारी सतींदर नरवाल यांनी सांगितले की, 42 वर्षीय शिवकुमारची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून ही हत्या केली. दोन्ही आरोपींनी कट रचत शिवकुमारची चाकूने हत्या केली. पोलिसांनी तपास केला असता या हत्येमागे मृताची पत्नी आणि तिचा प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सांगितले की, कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृताच्या पत्नीच्या प्रियकराने शिवकुमारला दारू पाजली आणि नंतर त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या