रायपूर, 22 फेब्रुवारी : लग्नाच्या रिसेप्शनच्या दिवशी नवरीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. पत्नीची हत्या केल्यानंतर नवरा मुलानेही आत्महत्या केली. छत्तीसगडमधील रायपूरमधील एका रक्तरंजित घटनेने संपूर्ण शहर हादरले असून या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. घटनेच्या दोन दिवस आधी दोघांनी प्रेमविवाह केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. आता पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. राजातालाब परिसरात राहणाऱ्या कहकशां बानो (22) हिचा अस्लमसोबत 19 फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. 21 फेब्रुवारीला मंगळवारी रात्री त्यांचे रिसेप्शन होते. घरातील सर्व सदस्य तयारीला लागले होते, संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. याचदरम्यान, अस्लम आणि कहकशां ही खोली बंद करून तयार होण्यासाठी गेले. काही वेळाने खोलीतून आरडाओरडा आणि किंचाळण्याचा आवाज आले. नातेवाइकांनी खोली उघडून पाहिले असता आत दोघांचेही मृतदेह पडलेले होते. कहकशांच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना आढळले की. वधू कहकशां हिच्या पोटावर, छातीवर, हातावर आणि दोन्ही हातांवर चाकूने हल्ला केल्याच्या अनेक खुणा आहेत. खोलीत तुटलेल्या बांगड्यांसह दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. क्राईम सीन पाहता दोघांमध्ये यापूर्वी भांडण झाले असावे, असे वाटत होते. हेही वाचा - गर्लफ्रेंडला भेटायला गेला विवाहित प्रियकर, मुलीच्या घरच्यांनी थेट विषयच संपवला! सीएसपी राजेश चौधरी यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री सातच्या सुमारास एक ब्युटीशियन वधूला तयार करण्यासाठी अस्लमच्या घरी पोहोचली होती. वराने तिला खोलीबाहेर पाठवले आणि दोघेही कपडे बदलू लागले. तेव्हाच दोघांमध्ये असे काही घडले की, वराचा राग वाढला आणि त्याने वधूला चाकूने भोसकून ठार केले आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केली. कशावरून बंद खोलीत दोघांमध्ये भांडण झाले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. पोलिसांनी अस्लमच्या घरावर आणि पोलीस ठाण्यात बंदोबस्त वाढवला होता. रिसेप्शनच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. राजातालाब परिसरातही शेकडो लोक जमले होते. हे हत्याकांड नेमके कशामुळे घडले, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.