JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / व्यक्तीच्या घरातून 30 कोटी रुपयांची ब्रँडेड घड्याळं जप्त; DRI च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

व्यक्तीच्या घरातून 30 कोटी रुपयांची ब्रँडेड घड्याळं जप्त; DRI च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने गेल्या आठवड्यात या व्यक्तीच्या घरातून 30 कोटी रुपयांहून अधिक किमतीची तस्करी केलेली घड्याळं जप्त केली आहेत.

जाहिरात

ब्रँडेड घड्याळ्यांची तस्करी करणाऱ्याला अटक (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता 24 जुलै : परदेशातून सोनं किंवा ड्रग्ज तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येतात. एअरपोर्टवर होणाऱ्या तपासणीत अशा घटना समोर येतात. कस्टम ड्युटी वाचवून परदेशातून भारतात सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न होतो. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 30 कोटी रुपयांच्या वस्तुंची तस्करी केली. पण ही वस्तू सोनं किंवा ड्रग्ज नाही तर घड्याळं आहेत. या संदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलं आहे. कोलकाता येथील एका व्यक्तीच्या घरातून प्रीमियम परदेशी ब्रँडची 30 हून अधिक घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटिलिजन्स म्हणजेच डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने गेल्या आठवड्यात या व्यक्तीच्या घरातून 30 कोटी रुपयांहून अधिक किमतीची तस्करी केलेली घड्याळं जप्त केली आहेत. डीआरआयने मिळालेल्या टिपच्या आधारे ही कारवाई केली होती. Ankit Murder Case : प्रियकराची हत्या करण्यासाठी सर्पमित्रासोबत ठेवले शारिरीक संबंध, अखेर प्रेयसीला अटक, मोठा खुलासा होणार डीआरआयला अशी माहिती मिळाली होती की एका व्यक्तीकडे परदेशी प्रीमियम ब्रँडची 30 पेक्षा जास्त तस्करी केलेली हाय-एंड प्रीमियम घड्याळं आहेत. डीआरआयला अशी टिप मिळाली होती की हा माणूस परदेशातून भारतात परत येणार आहे. तो काही चांगल्या दर्जाची ब्रँडेड घड्याळं घेऊन कस्टम ड्युटी न भरता देशात येण्याच्या विचारात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सिंगापूरहून आल्यानंतर गेल्या आठवड्यात कोलकाता विमानतळावर या प्रवाशाला रोखलं. त्याच्याकडे एक अतिशय महागडं ग्रेबेल फोर्सी घड्याळ होतं जे त्यानं कस्टम अधिकाऱ्यांसमोर डिक्लेअर केलं नव्हतं, ते जप्त करण्यात आलं, असं डीआरआयच्या एका पत्रकात म्हटलं आहे. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलम 104 अंतर्गत त्या प्रवाशाला अटक करण्यात आली. त्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या घराचीही झडती घेतली. त्याच्या घरातून ग्रीबेल फोर्सी, पुर्नेल, लुई व्हिटॉन, एमबी आणि एफ, मॅड, रोलेक्स, ऑडेमार्स पिगेट आणि रिचर्ड मिलसह प्रीमियम परदेशी ब्रँडची तब्बल 34 घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. सर्व घड्याळांची बाजारातील एकूण किंमत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. “बॅगेजमधून घड्याळं आयात केल्यावर बॅगेज नियमांनुसार 38.5% कस्टम ड्युटी आकारली जाते, पण या व्यक्तीने ती भरली नव्हती,” असं डीआरआयने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या