नवी दिल्ली 17 नोव्हेंबर : फूड ब्लॉगर आफताब पूनावालाने मे महिन्यात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून विल्हेवाट लावली. आफताबला श्रद्धाच्या हत्येनंतर चार महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, पण तो श्रद्धाला शोधण्यात पूर्ण मदत करणार असं सांगून आपल्यावरचा संशय टाळण्यास यशस्वी झाला होता. पण वसई पोलिसांच्या एका युक्तीमुळे तोच आरोपी असल्याचं शोधण्यास मदत झाली. वसईतील एका बारमध्ये पोलिसांनी आफताबला दारू पाजली, यावेळी दारूच्या नशेत त्याने या निर्घृण हत्याकांडाचा खुलासा केला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, श्रद्धाचे वडील विकास यांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. तपासाचा भाग म्हणून 28 वर्षीय आरोपी आफताबला 6 ऑक्टोबरनंतर चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण आफताब पोलिसांची दिशाभूल करण्याच्या तयारीनेच चौकशीसाठी आला होता. त्यामुळे तो 26 वर्षीय श्रद्धा वालकरसोबतच्या त्याच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल पोलिसांसमोर खूप आत्मविश्वासाने स्पष्टपणे बोलत होता. वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलंय की त्याने पोलिसांना सांगितलं की ‘श्रद्धा भांडणानंतर दिल्लीतील घर सोडून निघून गेली होती. परंतु, मी तिच्याशी पॅच-अप करण्याचा किंवा तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, ही माझी चूक होती.’ त्या रात्री नेमकं काय घडलं? श्रद्धाला का मारलं? हत्या प्रकरणात आफताबचा मोठा खुलासा पोलीस सूत्रांनी सांगितलं की, ऑक्टोबरमध्ये चौकशीनंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा आफताब खूप कॉन्फिडन्ट वाटला. आपल्या मृत लिव्ह-इन पार्टनरचा शोध घेण्यात पोलिसांना मदत करून तो डबल गेम खेळत असल्याचं त्याला वाटत होतं. या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा त्याला दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं तेव्हा त्याने काही परस्परविरोधी विधानं केली. त्याच्या बदललेल्या जबानीवरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी आफताबवर पाळत ठेवली. आफताबला वाटलं की नियमित चौकशी संपली आहे आणि पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नाही. पण पोलिसांचं मात्र त्याच्यावर लक्ष होतं. यावेळी चौकशी संपल्यानंतर आफताबने वसईतील एका बारला भेट दिली. या ठिकाणी त्याला श्रद्धाच्या हत्येबद्दल विचारलं आणि त्याने दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. आफताबने 3 नोव्हेंबर रोजी पोलिसांची भेट घेतल्यानंतर एका दिवसाने मुंबई सोडली, तेव्हा पोलिसांनी दिल्ली पोलिसांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगत सावध केलं होतं. 10 नोव्हेंबर रोजी पोलीस आफताबच्या घरी पोहोचले आणि चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं. Shraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करताना आफताब झाला होता जखमी, त्यानंतर… श्रद्धा वालकर प्रकरणातील लेटेस्ट अपडेट्स श्रद्धाची कवटी, मोबाईल फोन, हत्येसाठी वापरलेली हत्यारं अद्याप गायब वृत्तानुसार, जिथे आफताबने श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा दावा केला होता, त्याच जंगलातून आतापर्यंत पोलिसांना 10-13 हाडे सापडली आहेत. मात्र तिचं डोकं, कवटी अद्याप सापडलेली नाही. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिचं बँक अकाउंट अॅप ऑपरेट केले आणि 54,000 रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. आफताबने मोठ्या प्रमाणात पाणी वापरल्याचं त्याच्या फ्लॅटच्या 300 रुपयांच्या प्रलंबित पाण्याच्या बिलावरून सिद्ध झालं. आफताबने कदाचित रक्ताचे डाग पुसण्यासाठी आणि खुनाचे इतर पुरावे नष्ट करण्यासाठी हे पाणी वापरलं असावं. पोलिसांना आफताबच्या फ्लॅटमध्ये सापडले रक्ताचे डाग, हँड ग्लोव्ह्ज
आफताबच्या छतरपूरमधील फ्लॅटच्या किचनच्या खिडकीजवळ पोलिसांना रक्ताचे डाग आढळले. तसेच त्यांना सर्जरीसाठी वापरण्यात येणारे हँड ग्लोव्ह्ज सापडले. याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आफताबची नार्को टेस्ट होणार दिल्ली कोर्टाने बुधवारी पोलिसांना आफताबची नार्को टेस्ट करण्यास परवानगी दिली. तो तपासादरम्यान सहकार्य करत नसल्याचा आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. श्रद्धा-अफताबच्या स्टोरीत रोजच्या रोज होत आहेत नवनवीन खुलासे श्रद्धाचा मृत्यू झाल्याचं आफताबने सांगितलं, श्रद्धाच्या वडिलांची माहिती “आफताबने माझ्यासमोर कबूल केलं. पोलिसांनी त्याला विचारलं, ‘तू यांना ओळखतोस का? तर तो म्हणाला, ‘हो, ते श्रद्धाचे वडील आहेत’. मग लगेच, तो म्हणू लागला की श्रद्धा आता या जगात राहिली नाही. मी तिथेच खाली कोसळलो. मला काही ऐकू येत नव्हतं. नंतर पोलीस त्याला घेऊन गेले. पण नंतर तो जे बोलला, मी ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हतो,” असं विकास वालकर यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना सांगितलं. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, विकास वालकर यांनी जुन्या काही भेटीची आठवण सांगत आफताब कसा पूर्णपणे नॉर्मल होता, हे सांगितलं. श्रद्धा बेपत्ता असताना आफताबने कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेतली नाही आणि आता तोच या प्रकरणात आरोपी आहे, असं श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं. आफताबने श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये कापला आणि फोन OLX वर विकला रिपोर्ट्सनुसार, आफताबने श्रद्धाचा मृतदेह दिल्लीतील घराच्या बाथरूममध्ये कापला. त्याने पाण्याचा जास्त वापर केल्याने त्याच्यावर संशय निर्माण झाला होता. दरम्यान, आपल्या 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्यानंतर आफताबने आपला फोन ओएलएक्सवर विकल्याचं पोलिसांनी सांगितलं. आम्ही ब्रेकअप केलं होतं, फक्त फ्लॅटमेट म्हणून राहत होतो – आफताब आरोपी आफताब पूनावालाने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की जवळपास एक वर्षाहून अधिक काळापासून त्यांच्यांत सातत्याने भांडणं होत होती. अखेर त्यांनी ब्रेकअप केलं आणि ते कपल नव्हे तर फ्लॅटमेट म्हणून राहत होते. त्याने 18 मे रोजी रात्री 8 ते 9 दरम्यान श्रद्धाची हत्या केल्याचं कबूल केलंय. तसंच नंतर तिचा मृतदेह किचनमध्ये ओढून नंतर बाथरूममध्ये नेला आणि रात्रभर तिथेच ठेवल्याचं सांगितलं. वसईत ‘पती-पत्नी’ म्हणून राहत होते आफताब-श्रद्धा टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वसईमध्ये भाड्याने घर शोधत असताना आफताबने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची पत्नी म्हणून ओळख करून दिली होती.