सगळ्यात पहिला आणि महत्वाचा अँगल असा आहे की श्रद्धा लव जिहादचा शिकार झाली आहे. अनेकांकडून हे बोललं जात आहे, पण यात किती तिथ्य आहे हे पोलिस तपासात समोर येईलच.
एक अशी बातमी देखील समोर आली आहे की मृत्यूच्या वेळी श्रद्धा प्रेग्नेंट होती आणि याच कारणामुळे अफताबने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. पण याबाबत पोलिसांनी कोणतीही ऑफिशिल माहिती दिलेली नाही.
असं देखील सांगितलं जातं की श्रद्धाने अफताबला एका मुलीशी बोलताना पाहिलं होतं, ज्यामुळे त्यांच्यात भांडणं होऊन अफताबने तिला संपवलं आहे.
तर अशी माहिती समोर आली आहे की अफताबचे आणखी २० मुलींसोबत संबंध होते. जे श्रद्धाला कळले होते आणि तिने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली होती ज्यामुळे त्याने तिला संपवलं.
श्रद्धा अफताबला लग्न करण्यासाठी फोर्स करत होती आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, तसेच दिल्लीमध्ये श्रद्धा ही अफताबवर डिपेंडन्ट होती. ज्यामुळे त्याने तिला संपवण्यासाठी संपूर्ण प्लान आखला.
एका रिपोर्टप्रमाणे असं देखील सांगितलं जात आहे की अफताबने श्रद्धाला मारण्यासाठी एवढा मोठा प्लान आखला, तर पोलिसांसमोर लगेच गुन्हा का मान्य केला, यामागे कोणतं मोठं गुढं आहे का? किंवा पोलीसांना तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीय, यामुळे त्याने असं केलंय.
यात आणखी एक अँगल असा समोर आला आहे की श्रद्धाला अफताबला सोडायचं होतं, पण अफताब तिला सोडण्यासाठी तयार नव्हता, अखेर हे भांडण श्रद्धाच्या जिवावर उठलं.
वरील समोर आलेली कारणं हे फक्त आणि फक्त अँगल आहे. यापैकी कोणत्याही गोष्टी खुलासा झालेला नाही. जेव्हा ही केस कोर्टात पोहोचेल, तेव्हाच काय ते सत्य सर्वांसमोर येईल.