JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / मृत्यूनंतरही भावांचा वाद संपेना; वृद्धाचा मृतदेह 50 तास दफनविधीच्या प्रतीक्षेत, संतापजनक कारण समोर

मृत्यूनंतरही भावांचा वाद संपेना; वृद्धाचा मृतदेह 50 तास दफनविधीच्या प्रतीक्षेत, संतापजनक कारण समोर

बडोरा गावातील रहिवासी असलेले ७२ वर्षीय रशीद अन्सारी उर्फ ​​रशीद मिया यांचा शुक्रवारी ७ एप्रिल रोजी रात्री उशिरा मृत्यू झाला. त्यानंतर मयताच्या मुलांनी घराजवळ पुरलेल्या मृताच्या पत्नीजवळच दुसरी कबर खोदण्यास सुरुवात केली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 10 एप्रिल : एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात बिहारमधील आरा येथे एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह दोन दिवस न पुरता तसाच ठेवण्यात आला होता, परंतु त्याच्या मृतदेहासाठी 6 फूट जमीनही मिळाली नाही. हे संपूर्ण प्रकरण गधनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरौरा गावाशी संबंधित आहे. जमिनीच्या वादादरम्यान मृत्यू झालेल्या रशीद अन्सारी उर्फ ​​रशीद मियांचा मृतदेह तब्बल 50 तासांपासून कबरीच्या प्रतीक्षेत होता. बडोरा गावातील रहिवासी असलेले ७२ वर्षीय रशीद अन्सारी उर्फ ​​रशीद मिया यांचा शुक्रवारी ७ एप्रिल रोजी रात्री उशिरा मृत्यू झाला. त्यानंतर मयताच्या मुलांनी घराजवळ पुरलेल्या मृताच्या पत्नीजवळच दुसरी कबर खोदण्यास सुरुवात केली, परंतु मृताच्या भावांनी आणि त्याच्या कुटुंबीयांनी जमिनीच्या वादाचं कारण देत कबर खोदण्यास नकार दिला. त्यानंतर जवळपास 50 तास मृतदेह कबरीच्या प्रतिक्षेत राहिला. प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली बायको, नवऱ्याला दिलं विष, त्या Video ने सत्य आलं समोर मृतकाचा मुलगा मोहम्मद जुबेर फारुख याने सांगितलं की, वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही घराजवळील आईच्या कबरीजवळ कबर खोदण्यास सुरुवात केली. मात्र तेवढ्यात माझे काका मैनुद्दीन आणि मोहम्मद सैफुद्दीन अन्सारी आले आणि त्यांनी कबर खोदण्यास नकार दिला. ते म्हणाले, की ही जमीन आम्हा सर्व बांधवांच्या वाट्याला येते. त्यामुळे तुम्ही लोक इथे थडग्या खोदू शकत नाहीत. दुसरीकडे, कबर खोदणं थांबवणाऱ्या दुसऱ्या पक्षाकडून वाद जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सांगितलं की, मयत रशीद अन्सारी याने त्याच्या हिश्श्यापेक्षा जास्त जमीन विकली आहे. आता त्याची जमीन शिल्लक नाही. ज्या जमिनीत त्यांची मुलं कबर खोदत आहेत ती जमीन रशीद मियाँ सोडून इतर पाच भावांच्या वाट्याला येते. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जमिनीच्या वादात रशीद मियाँ यांचा मृतदेह 50 तासांपेक्षा जास्त काळ दफन विधीसाठी पडून असल्याचं आढळून आलं. दुसरं म्हणजे, याच जमिनीच्या वादात दोन वर्षांपूर्वी मरण पावलेल्या रशीद मिया यांची पत्नी झैनाब खातून यांचा मृत्यू झाल्यानंतरही मृतदेह ७२ तास पडून होता, असंही समोर आलं. त्यानंतर स्थानिक सीओ आणि स्टेशन प्रभारी यांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह त्याच ठिकाणी दफन करण्यास परवानगी देण्यात आली होती. मृतकांच्या मुलांनी सांगितलं की, आमच्या आई आणि वडिलांची इच्छा होती की मृत्यूनंतर आम्हाला घराजवळ त्याच ठिकाणी दफन केलं जावं. आमच्या कबरीवर मजार बनवावी आणि चादर चढवावी. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी आम्ही अम्मीला दफन करून मजार बांधली होती आणि अब्बूचा मृतदेह दफन करून मजार बनवण्याची शेवटची इच्छा आहे. मृतदेह दफनासाठी ठेवल्यानंतर 50 तासांनंतर नातेवाईकांनी गढणी पोलीस ठाणे आणि सीओ यांना वादाची माहिती दिली. त्यानंतर गढणी सीओ, स्टेशन अध्यक्ष घटनास्थळी आले आणि स्थानिक सरपंच जुबेर अली यांच्या नेतृत्वाखाली पंचायत बोलवण्यात आली. त्यानंतर वाद करणाऱ्या भावांना समजवण्यात आलं आणि मग ते कबर खोदू देण्यास तयार झाले. त्यानंतर काही दिवसांनी जनता दरबार झाला आणि जमिनीचा वाद मुळापासून उखडून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या