आशुतोष तिवारी, प्रतिनिधी रीवा, 9 एप्रिल : देशात अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून आत्महत्या आणि हत्येसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून एका खुनाच्या घटनेने मध्यप्रदेशातील रेवा पोलीस चक्रावून गेले.
याठिकाणी आधी एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला आणि संधी मिळताच चहामध्ये विष पाजले. यामुळे पतीचा मृत्यू झाला. मात्र, महिलेने या प्रकरणाला आत्महत्या केल्याचे सांगितले. पण, या घटनेशी संबंधित मृत शाहिद खानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर घटनेबाबत मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला. मृत्यूपूर्वी शाहिदने एक व्हिडिओ बनवला होता, यामध्ये त्याने पत्नी, तिचा प्रियकर आणि आई-वडिलांवर जीवे मारण्याबाबत अंदाज वर्तवला होता. या व्हिडिओनंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकर आणि आईला अटक केली.
या घटनेबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी सांगितले की, पत्नीने प्रियकर आणि आई-वडिलांसोबत मिळून पतीला विष देऊन ठार केल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी सध्या तीन आरोपींना अटक केली आहे, असे त्यांनी सांगितले. या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यास पोलिसांना वेळ लागला. यापूर्वी पोलिसही याला आत्महत्या मानत होते. मात्र, मृताचे वडील सुरुवातीपासूनच हत्येची भीती व्यक्त करत होते. शवविच्छेदन अहवालात, खुनाची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम मृतांच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले. पत्नीने प्रियकर आणि पालकांच्या संगनमताने मुलाची हत्या केल्याचा आरोप शाहिदच्या नातेवाईकांनी केला आहे. अशा स्थितीत पोलिसांनी सर्व संशयितांची कसून चौकशी केली. त्यानंतरच पोलिसांना यश आले असून आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला आहे. सध्या पत्नी, प्रियकर आणि आईला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे, तर वडील फरार आहेत. पतीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून तपास केला. त्यानंतर हत्येचे गूढ उकलले. पोलिसांनी आरोपी प्रियकर शकील खान उर्फ बंटू (35), मुलगा शफीक खान, शलेहा परवीन (31), पत्नी शाहिद खान, मोना परवीन पत्नी शमशुल हक यांना अटक केली आहे.