जयपूर 25 जुलै: दलितांवरील अत्याचाराचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. यात एका दलित व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला काही लोकांना बेदम मारहाण केली (Dalit Man and His Son Were Beaten). इतकंच नाही तर यानंतर त्यांना मूत्र पिण्यासही भाग पाडलं (Forced to Drink Urine) . पोलिसांनी (Police) शनिवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं, की आरोपींनी मारहाण करणाऱ्यासोबतच या दलित वडील आणि मुलाला जातीवरुन शिव्याही दिल्या गेल्या. ही संतापजनक घटना राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेर येथे घडली आहे. नदीत उडी घेत एकाच कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; धुळ्यातील हृदयद्रावक घटना इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायचंद मेघवाल आणि त्यांचा मुलगा रमेश हे बाडमेरच्या बिजराड ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावात किराणा दुकानातून सामान खरेदी करत होते. इतक्यात अचानक कमीत कमी 15 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारहाण केल्यानंतर रायचंद याला मूत्र पिण्यास भाग पाडलं. पोलिसांनी सांगितलं, की आरोपींनी जातीवरुन शिव्या देत दोघांचा अपमानही केला. शाळेत यायला उशीर झाल्यानं चिमुकलीला जबरी शिक्षा; प्रकृती खालावल्यानं झाला खुलासा मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत रायचंद यांच्या डोक्याला मार लागला आहे आणि त्यांचा एक दातही तुटला आहे. तर, रमेशचा पाय तुटला असून हातालाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बापलेकानं केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी खेत सिंह याच्यासह 15 जणांविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिसांना असा संशय आहे, की हे जुन्याच भांडणाचं प्रकरण आहे. पोलिसांनी सांगितलं, की सर्व आरोपी फरार असून सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे.