JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / 8.5 कोटींसमोर फक्त 10 रुपयांची फ्री फ्रुटी ठरली 'भारी'; 'लुटेरी हसीना' जाळ्यात अडकली

8.5 कोटींसमोर फक्त 10 रुपयांची फ्री फ्रुटी ठरली 'भारी'; 'लुटेरी हसीना' जाळ्यात अडकली

साध्या वेशातील पोलिसांनी मोफत फ्रुटी वाटण्यास सुरुवात केली. फ्रुटी पिण्यासाठी मास्क काढताच पोलिसांच्या त्यांच्या हातात बेड्या घातल्या.

जाहिरात

मनदीप आणि तिच्या पतीला लवकर श्रीमंत व्हायचं होतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोनिया मिश्रा, प्रतिनिधी चमोली, 22 जून : पंजाबमध्ये साडेआठ कोटींचा डल्ला मारणाऱ्या दरोडेखोर मनदीप कौर मोना आणि तिचा पती जसविंदर या दोघांच्या मसुक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. चमोली जिल्ह्यातील हेमकुंड साहिब येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. दोघं दर्शनासाठी येथे आले होते. दरम्यान, साडेआठ कोटींच्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 10 जून रोजी लुधियानाच्या न्यू राजगुरू नगरमध्ये दरोडा पडला होता. त्याची सूत्रधार मनदीप कौर मोना होती. ती घटना घडल्यापासून फरार झाली होती. पंजाब पोलिसांना मनदीप आणि जसविंदर दोघंही हेमकुंड साहिबमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. साध्या वेशातील पोलिसांनी तेथील भाविकांना मोफत फ्रुटी वाटण्यास सुरुवात केली आणि मोना, जसविंदरने फ्रुटी पिण्यासाठी मास्क काढताच पोलिसांच्या त्यांच्या हातात बेड्या घातल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरू नगरजवळील सीएमएस इन्फो सिस्टीम्स लिमिटेडच्या कार्यालयातून कॅश व्हॅनसह 8.49 कोटी रुपयांची चोरी झाली होती. रात्री उशिरा एका महिलेसह 10 सशस्त्र हल्लेखोरांनी कंपनीच्या कार्यालयात घुसून पाच कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवलं. त्यानंतर कॅश व्हॅनमध्ये 8.49 कोटी रुपये घेऊन ते पळाले. तिथून 20 किलोमीटर अंतरावर मुल्लापूरजवळ त्यांनी व्हॅन सोडली. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. महिलेनं मृत्यूनंतर मागे सोडली कोट्यवधींची संपती, पण कोणी घेऊ शकणार नाही अशी अट ठेवली समोर चंदीगडचे पोलीस आयुक्त मनदीप सिंह सिद्धू यांनी सांगितलं की, मनदीप आणि तिच्या पतीला लवकर श्रीमंत व्हायचं होतं. मनदीपला परदेशात स्थायिक व्हायचं होतं. दोघं नेपाळमार्गे पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी आम्हाला माहिती मिळाली होती. परंतु लुकआउट नोटीस जारी झाल्यामुळे त्यांचा हा प्लॅन फसला. त्यानंतर हेमकुंड साहिबहून दोघांना केदारनाथ आणि नंतर हरिद्वारला जायचं होतं’, अशी माहिती त्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या