कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लग्न केलं. तो जावरा कंपाऊंडमधील हर्ष शर्मा याच्या घरात राहत होती.
सुमित सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 17 फेब्रुवारी : कर्जाचा हप्ता भरण्याकरीता लावलेल्या तगादयाचा राग मनात धरून उरुळी कांचनमधील बजाज फायनान्स शाखेचे (bajaj finance) पर्सनल लोनचे सेल्स मॅनेजर रवींद्र प्रकाश वळकुंडे यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील आणि हवेली तालुक्यातील सीमेवर बोरीभडक गावचा राहणार असलेला कर्जदार राहुल लक्ष्मण गाढवे असं आरोपीचं नाव आहे. राहुलने बजाज फायनान्सच्या उरूळीकांचन शाखेकडून कर्ज घेतले होते. पण, राहुलकडून कर्जाचे हफ्ते हे फेडले गेले नाही. त्यामुळे या महिन्यात तुमच्या LPG गॅसवर किती मिळेल सबसिडी? अशाप्रकारे घरबसल्या तपासा उरुळी कांचन शाखेच्या पर्सनल लोनचे सेल्स मॅनेजर रवींद्र प्रकाश वळकुंडे यांनी आरोपी राहुलकडे कर्जाचा हप्ता भरण्याकरीता पाठपुरावा करीत होते. त्यामुळे मनात राग धरून कर्जदार राहुल गाढवे याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता घेऊन त्या लोखंडी कोयत्याने रवींद्र वळकुंडे यांच्या डोक्यात आणि मानेवर पाठीमागून वार केले. धक्कादायक! आईच्या हत्येनंतर 2 लेकरं मृतदेहाशेजारीच खेळत राहिली, बाप फरार त्यामुळे गंभीर जखमी झालेले रवींद्र वळकुंडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे उरुळी कांचनमध्ये खळबळ उडाली आहे.