JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / काकीचं होतं पुतण्यावर प्रेम; पतीला हटवण्यासाठी आखला प्लान, 10 महिन्यांनी धक्कादायक खुलासा

काकीचं होतं पुतण्यावर प्रेम; पतीला हटवण्यासाठी आखला प्लान, 10 महिन्यांनी धक्कादायक खुलासा

10 महिन्यांनी हाडांचा सापळा सापडल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 19 जून : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) सतना जिल्ह्याच्या सिंहपुर पोलीस ठाणे हद्दातील उसरहा गावात 16 जून रोजी सापडलेल्या हाडांच्या सापळ्यानंतर सत्य (Killed Husband) समोर आलं आहे. सिंहपुर पोलीस ठाण्याचे प्रमूख आणि त्यांच्या टीमने हत्येचा खुलासा केला. अवघ्या 48 तासात पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं. मृतदेहाला वजनदार दगड बांधलेला होता. त्यामुळे हे प्रकरण हत्येचं असल्याचं समोर आलं. नात्यात काकू-पुतण्यामध्ये होतं प्रेम… हत्या प्रकरणात पत्नीने पोलिसांना सांगितलं की, पती तिच्या प्रेमाच्या आड येत होता. त्यामुळे पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचला. आणि 21 ऑक्टोबर 2021 रोजी हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. आरोपी उर्मिला कुशवाहा आणि तिचा प्रियकर कैलाश कुशवाहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांमध्ये काकी-पुतण्याचं नातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैलाश आणि उर्मिला या दोघांनी मिळून शिवकुमार कुशवाहा याला काही कारण सांगून विहिरीजवळ नेलं. पतीची हत्या केल्यानंतर काकी-पुतण्याला भेटायला कोणी रोखू शकणार नाही, या हेतूने त्यांनी हा प्लान रचला. योजनेनुसार, 21 ऑक्टोबर 2021 च्या रात्री 11 वाजता कैलाशने सांगितल्यानुसार आरोपी उर्मिलाने पती शिवकुमारला शौचाच्या बहाण्याने विहिरीजवळ घेऊन गेली. रस्त्यात कैलाश भेटला आणि त्याने शिवकुमार कुशवाहाच्या डोक्यात काठीने वार करून त्याला बेशुद्ध केलं. यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार… यानंतर दोघांनी मिळून मृत शरीर तारेच्या माध्यमातून दगडाने बांधलं आणि विहिरीत फेकून दिलं. पुढील काही दिवस पत्नी शांत होती. यानंतर उर्मिलाने पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदली. 3 जानेवारी 2022 रोजी तिने याबाबत तक्रार केली. 8 वर्षांपासून सुरू होतं प्रेमप्रकरण… शिवकुमारची पत्नी आणि कैलाश यांच्यामध्ये गेल्या 8 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. गावातदेखील दोघांच्या प्रेमाची चर्चा होती. मात्र शिवकुमारला याबाबत काहीच माहीत नव्हतं. एके दिवशी कोणाकडून तरी त्याला याबाबत कळालं. पत्नीला त्याने थांबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्नीला प्रियकरला भेटण्यास मनाई करण्यात आली होती. त्यातूनच पत्नी आणि प्रियकराने हत्येचा प्लान आखला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या