पुण्यात तरुणीवर कोयत्यानं हल्ला
पुणे, 27 जून : पुण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. बातमीनं खळबळ उडाली आहे. दर्शना पवार हत्याकांड ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एका तरुणीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील ही घटना आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
या घटनेंन पुण्यात खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात ही तरुणी जखमी झाली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीला त्रास देत होता. अनेकदा त्याला समजावून देखील सांगण्यात आले होते. त्याच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची कल्पना देण्यात आली होती. मात्र एवढं होऊन देखील आरोपीने मुलीला फोन करून धमकी दिली. धमकी देण्यात आल्यानंतर पुन्हा मुलीच्या आईने या मुलाला समजावून सांगितलं. तिला तुझ्यासोबत फ्रेन्डशिप करण्याची इच्छा नाही तू जर तिला पुन्हा त्रास दिला तर मी पोलीसात तक्रार करेल असं मुलीच्या आईने आरोपीला बजावलं. याचाच राग आल्यानं आरोपीनं मुलीला रस्त्यात एकटं पाहून तिच्यावर कोयत्यानं वार केला. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे. Pune News : पुणेकरांमध्ये टोळक्याची दहशत, पुन्हा वाहनांची तोडफोड; घरावरही दगडफेक दरम्यान दर्शना पवार हत्याकांडाचं प्रकरण ताज असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला. आरोपीनं एकतर्फी प्रेमातून तरुणीवर वार केला आहे. या घटनेत तरुणी थोडक्यात बचावली आहे. मात्र तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे.