JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Atiq Ahmad News : यूपी पोलिसांनी कसं केलं अतिक अहमदच्या पोराचं एन्काऊंटर?

Atiq Ahmad News : यूपी पोलिसांनी कसं केलं अतिक अहमदच्या पोराचं एन्काऊंटर?

अतिक अहमदचा मुलगा असद हा गेल्या अनेक दिवसांपासून उमेश पाल हत्याकांड प्रकरणात फरार होता. अखेर पोलिसांकडून त्याचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे.

जाहिरात

अखेर झाशीमध्ये पोलीस अधिकारी विमल आणि नवेंदु याच्या नेत्वृत्वातील पथकासोबत झालेल्या चकमकीमध्ये असद आणि गुलाम यांचा खात्मा करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रयागराज, 13 एप्रिल : अतिक अहमदचा मुलगा असद हा गेल्या अनेक दिवसांपासून उमेश पाल हत्याकांड प्रकरणात फरार होता. अखेर आज युपी पोलिसांनी असदचं एन्काऊंटर केला. पोलिसांसोबत झालेल्या चकमीकमध्ये  असद मारला गेला आहे. असद सोबतच शार्पशुटर गुलाम अहमद याचा देखील मृत्यू झाला आहे. या दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचा इनाम होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माफीया अतीक अहमद याचा मुलगा असद आणि मकसूदचा मुलगा गुलाम गेल्या अनेक दिवसांपासून उमेश पाल हत्येप्रकरणात फरार होते. दोघांवर पाच लाख रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आलं होतं. पोलिसांकडून देखील गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अखरे झाशीमध्ये पोलीस अधिकारी विमल आणि नवेंदु याच्या नेत्वृत्वातील पथकासोबत झालेल्या चकमकीमध्ये असद आणि गुलाम यांचा खातमा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.  उमेशपाल हत्याकांड प्रकरण बसपाचे आमदार राजू पाल यांची 2015 मध्ये हत्या करण्यात आली होती. राजू पाल यांची प्रयागराजच्या धूमनगंज परिसरात त्यांच्या राहात्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यामध्ये त्यांचा सुरक्षा रक्षक संदीप निषाद याचा देखील मृत्यू झाला होता. उमेश पाल हे या प्रकरणातील एकमेव साक्षीदार होते. परंतु नंतर त्यांची देखील हत्या करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या