JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Pune: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे, काय विषय आहे तो मिटवून घ्या' पार्थ पवारांच्या नावाचा वापर करुन थेट पोलिसांवरच दबाव

Pune: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे, काय विषय आहे तो मिटवून घ्या' पार्थ पवारांच्या नावाचा वापर करुन थेट पोलिसांवरच दबाव

Pimpri Chinchwad: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नावे पोलीस अधिकाऱ्यालाच एकाने धमकावल्याचं समोर आलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला धमकावत चुकीच्या पद्धतीने तपास करण्यासाठी दबाव टाकल्याच प्रकरण समोर आले आहे.

जाहिरात

'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे, काय विषय आहे तो मिटवून घ्या' पार्थ पवारांच्या नावाचा वापर करुन थेट पोलिसांवरच दबाव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 29 मार्च : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash) यांच्या नावे खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराच्या एका टोळीला स्वतः कृष्ण प्रकाश यांनीच वेष बदलून रंगेहाथ अटक केली. ही घटना ताजी असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नावे पोलीस अधिकाऱ्यालाच एकाने धमकावल्याचं समोर आलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला धमकावत चुकीच्या पद्धतीने तपास करण्यासाठी दबाव टाकल्याच प्रकरण समोर आले आहे. मात्र या प्रकरणाची माहिती पाच दिवस आधी असून देखील फोन करून धमकावणाऱ्या व्यक्तीपर्यंत हिंजवडी पोलीस अद्यापही पोहचू न शकल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशनमधील (Hinjawadi Police Station) सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अश्रफ मर्चंट नामक मोबाइलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड परिसरातील अमित कलाटे नावाच्या व्यक्तीवर जमीन व्यवहारात फसवणूक आणि सावकारी कायद्यानुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हे आणि व्याजाचे पैसे न दिल्याने महागडी मोटार ओढून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी 22 मार्च रोजी आरोपी मर्चंट याने फिर्यादीने पोलीस अधिकारी नकुल न्यामने यांना फोन केला. ‘‘मी पार्थ भाऊंचा मित्र…" ‘‘मी पार्थ भाऊंचा मित्र आहे, तुमच्याकडे अमित कलाटेचा विषय आहे का? तुमचा त्या विषयात काय स्टॅन्ड आहे, मी आणि पार्थ पवार यांचे पीए सागर जगताप हे कलाटे याचे खास मित्र आहोत. तुम्हाला मी सांगतोय ते ऐका, वाटल्यास तुम्हाला मी जिजाई बंगला, भोसले नगर येथे थेट समोर घेऊन जाईन, अमितचा काय असेल तो विषय तुम्ही मिटवून घ्या, नाहीतर विषय वरपर्यंत घेऊन जावे लागेल. राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी देखील मला तुम्हाला विचारून घ्यायला सांगितले आहे, असे बोलून आरोपीने फिर्यादी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. वाचा :  सासऱ्यानेच केला सुनेचा खून आणि मग उचललं टोकाचं पाऊल, रत्नागिरीत खळबळजनक घटना त्यानंतर पुन्हा सोमवारी फिर्यादी हे कर्तव्यावर असताना आरोपीने त्यांना फोन करून दाखल गुन्ह्यात खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी राजकीय पक्षाच्या मोठ्या पदावरील नावाचा वापर करून दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे करीत असल्याची माहिती मिळतेय. वाचा :  वरुण सरदेसाई यांच्यासमोर युवासेनेच्या दोन गटांत राडा,फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO मोबाइलवरून धमकी देणाऱ्या अश्रफ मर्चंट नामक व्यक्तीविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आला असला तरी हिंजवडी पोलीस अद्यापही त्याच्यापर्यंत शकले नाहीत. एकीकडे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या नावे खंडणी मागणाऱ्या आरोपीला पकण्यासाठी स्वतः वेषांतर करून मोठ्या शिताफीने आरोपीला जेरबंद केलं. मात्र मोठ्या नेत्यांची नावे सांगून खुद्द पोलिसांनाच धमकवणाऱ्याला पोलीस सापळा रचून पकडू शकले असते मात्र धमकी मिळाल्या नंतरही फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल पाच दिवसांचा वेळ घालवला. तसेच अद्यापही ते गुन्हेगारापर्यंत पोहचू शकले नाही. दुसरीकडे अश्रफ मर्चंट नामक व्यक्तीला आपण किंवा पार्थ पवार कधीही भेटलो नसल्याचा दावा पार्थ पवार यांचे स्वीय सहायक सागर जगताप यांनी News 18 Lokmat शी बोलताना केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या