Home /News /maharashtra /

धक्कादायक ! पोटात सुरा खुपसून सुनेचा खून मग स्वत: सासऱ्यानेही उचललं टोकाचं पाऊल, रत्नागिरीत खळबळजनक घटना

धक्कादायक ! पोटात सुरा खुपसून सुनेचा खून मग स्वत: सासऱ्यानेही उचललं टोकाचं पाऊल, रत्नागिरीत खळबळजनक घटना

सासऱ्यानेच केला सुनेचा खून आणि मग उचललं टोकाचं पाऊल, रत्नागिरीत खळबळजनक घटना

सासऱ्यानेच केला सुनेचा खून आणि मग उचललं टोकाचं पाऊल, रत्नागिरीत खळबळजनक घटना

Ratnagiri Crime News: रत्नागिरी जिल्ह्यात सासऱ्यानेच सुनेची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

    शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 29 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri district) टाळसूरे गावातील आरती अभिषेक सणस (Aarti Abhishek Sanas) (वय 32 वर्षे) या विवाहितेचा खून झाला आहे. हा खून तिच्याच सासऱ्याने केल्याची माहिती समोर येत आहे. मधुकर धोंडू सणस नामक सासऱ्याने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर सासऱ्याने उचललं टोकाचं पाऊल सासऱ्यानी सुनेवर हल्ला केल्याने सुनेचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू नंनतर सासऱ्याने सुद्धा स्वतःवर वार करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत मधुकर सणस हा तिचा सासराही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा : जीव गेल्यानंतरही कुऱ्हाड डोक्यातच खुपसलेली, 19 वर्षीय गुन्हेगाराची भयंकर हत्या पोलीस तपास सुरू या प्रकरणाची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आरती सणस या आशा सेविकेचा घरातीलच कोणीतरी खून केल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आठ-नऊ वर्षांपूर्वी झालेला विवाह या विवाहितेचा खून झाल्यावर तिचे सासरे मधुकर धोंडू सणस यानी स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जखमी अवस्थेत डेरवण येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर मयत विवाहीतेचा विवाह आठ ते नऊ वर्षापूर्वी झाला असून तिला सहा वर्षांचा मुलगा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वाचा : पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, VIDEO शूट करुन उचललं टोकाचं पाऊल दापोली तालुका पुन्हा हादरला प्राथमिक अंदाजावरून या महिलेचा खून हा जवळच्या व्यक्तीकडून झाला असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी काशिद, दापोली पोलीस निरीक्षक आहिरे पोलीस पथकासहीत दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. काहीच महिन्यापूर्वी तिहिरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा महिलेच्याच खूनाची घटना दापोली तालुक्यात घडली असल्याने पुन्हा एकदा सुसंस्कृत तालुका हादरला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Murder, Ratnagiri

    पुढील बातम्या