JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आईची हत्या करून 2 दिवस घरात ठेवला मृतदेह; बापाशी सामना होताच 10 वीतील मुलाची भयंकर प्रतिक्रिया

आईची हत्या करून 2 दिवस घरात ठेवला मृतदेह; बापाशी सामना होताच 10 वीतील मुलाची भयंकर प्रतिक्रिया

पत्नीची हत्या झाल्याचं कळताच आर्मी ऑफिसर तातडीने घराच्या दिशेने निघाले. येथे मुलगा आणि ते समोरासमोर आले. आणि तो म्हणाला…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 9 जून : सख्ख्या मुलानेच पत्नीची (Killed Mother) हत्या केल्याचं कळताच सैन्य अधिकारी एनके सिंह आसनसोलहून लखनऊला पोहोचले. येथे (Uttar Pradesh News) पोलिसांनी त्यांना काही प्रश्न विचारले. यावेळी विविध कक्षात पोलिसांनी वडील आणि काकांसमोर आरोपी मुलाला हजर केलं. वडील आणि मुलगा समोरासमोर आल्यानंतर दोघेही गप्प होते. यानंतर वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. वडिलांना रडताना पाहून मुलगाही विचलित झाला. मात्र काही वेळातच तो सामान्यपणे वागू लागला. वडील म्हणाले, हे काय केलंस…जर मी तुला ओरडलो असतो तर मलाही मारलं असतं. यावर मुलगा निर्लज्जपणे म्हणाला की, हे तर वेळच सांगेल. पुढे तो म्हणाला की, तुम्ही माझं कधी ऐकलच नाही. आईने तक्रार केल्यानंतर लगेच मला ओरडत होता.

दोन दिवस आईचा मृतदेह घराच ठेवला… चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपी मुलाला विचारलं की, त्याने दोन दिवस आईचा मृतदेह घरातच ठेवला, याची त्याला भीती वाटली नाही का? यावर आरोपी मुलगा म्हणाला की, सोमवारी रात्री मला भीती वा टली होती. म्हणून जवळच्या मित्राला रात्री राहायला बोलावलं होतं. आईची हत्या केल्यानंतर तिची खोली बाहेरून बंद केली होती. मित्राला काही कळालं नाही.

सैन्य अधिकाऱ्याच्या पत्नीऐवजी मुलगा देत होता उत्तर… आसनसोलच्या सैन्य अधिकाऱ्याने अनेकदा पत्नीला फोन केला, मात्र काहीच उत्तर मिळालं नाही. त्याला वाटलं की, पत्नी नाराज झाली आहे. एनके सिंह यांनी इन्स्पेक्टरांना सांगितलं की, आमच्यामध्ये काही भांडण नव्हतं झालं, तरीही पत्नीला कसला राग आला हे देखील मला कळत नव्हतं. सायंकाळी पत्नीच्या मोबाइलवरुन मेसेज आला तेव्हा कुठे बरं वाटतं. यावेळी पत्नी नाही तर मुलगा व्हॉट्सअॅपवरुन मेसेज करीत होता.

मंगळवारी मुलाने बापाला फोन करून सांगितलं की, कोणीतरी आईची हत्या केली आहे. यामागे काहीतरी कारणंही सांगितलं. यानंतर सैन्य अधिकाऱ्याने तातडीने शेजारी आणि भावाला याबाबत कळवलं. यादरम्यान त्याने आरोपी म्हणून आकाशचं नाव पुढे केलं. दरम्यान पोलीस तपासात मुलानेच हत्या केल्याचं समोर आलं. हे वडिलांना कळवताच त्यांना धक्काच बसला.

संबंधित बातम्या

आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही… आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाला त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप आहे का, असा सवाल केल्यानंतर तो गप्प उभा होता. दुसऱ्यांदा विचारल्यानंतरही काहीच म्हणाला नाही.

जाहिरात

एक वर्षापूर्वी घरातून पळाला होता… एक वर्षापूर्वी तो आई-वडिलांपासून नाराज होत पळून गेला होता. आई आणि शेजारी त्याला दिवसभर शोधत होते. घरात आई-बाबा सतत ओरडत असल्यामुळे पळाल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. आरोपी हा 10 वीचा विद्यार्थी आहे. याबाबत चौकशी केली असता तो शाळेत सतत मारामारी करीत असल्याचं समोर आलं. शाळेतून अनेकदा त्याच्याविरोधात तक्रारी येत होत्या.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या