नवी दिल्ली 19 जून : लग्नानंतर काही महिन्यांनी एका महिलेला आपल्या पतीचं असं सत्य समजलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली (Marriage Fraud). महिलेनं ज्या व्यक्तीशी लग्न केलं होतं, ती पुरुष नसून महिला निघाली (Shocking Incident). त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली आणि प्रकरण कोर्टात पोहोचलं. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, ही घटना इंडोनेशियातील आहे. जिथे गेल्या आठवड्यात एका महिलेनं कोर्टात सांगितलं की, तिने पुरुष समजून ज्याच्यासोबत लग्न केलं, तो महिला असल्याचं तिला लग्नानंतर 10 महिन्यांनी समजलं. आरोपी महिलेनं आपली ओळख लपवून लग्न केलं होतं. सध्या गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची ओळख उघड केली गेली नसून आरोपी महिलेचं नाव इरायणी असल्याचं सांगण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, महिला आणि Erayani यांची भेट मे 2021 मध्ये डेटिंग अॅपद्वारे झाली होती. महिलेनं सांगितलं की, इरायणी तिच्या सोशल मीडिया प्रोफाइल आणि संभाषणातून पुरुषासारखी दिसत होती. इरायणीने महिलेला सांगितलं की, तो सर्जनसोबत व्यवसाय करतो. त्याने नुकतंच धर्मांतर केलं आहे आणि तो पत्नीच्या शोधात आहे. लव्ह मॅरेजमुळे संतापलेल्या भावांनी भर बाजारात केली बहिणीची हत्या, 3 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न तब्बल तीन महिने एकमेकांशी बोलणं झाल्यानंतर महिलेनं Erayani सोबत लग्न केलं. लग्नानंतर Erayani महिलेच्या घरी राहू लागली. परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतर, महिलेच्या पालकांना काहीतरी गडबड असल्याचा संशय येऊ लागला, कारण Erayani पीडित महिलेकडून पैसे मागत राहिली आणि तिच्या नोकरी/व्यवसायाबद्दल लपवत राहिली. कुटुंबीयांचे प्रश्न टाळण्यासाठी तिने महिलेला दुसऱ्या शहरात नेलं आणि तिथे दोघंही भाड्याच्या घरात राहू लागले. तिथे Erayani ने महिलेला अनेक महिने घरात डांबून ठेवलं आणि तिला कोणाशीही बोलण्यास बंदी घातली. अनेक दिवस मुलीशी बोलणं होत नसल्यानं महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी Erayani चा शोध घेतला आणि चौकशीत जे काही समोर आलं ते जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नव्या नवरीने दिली Good News; नवरदेवाला बसला धक्का, थेट पोलिसात धाव! महिला ज्याला पुरुष समजत होती, तो पुरुष नसून एक स्त्री असल्याचं समोर आलं. Erayani ने फसवणूक करून पीडित महिलेशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 10 महिन्यांत तिने पीडितेकडून 15 लाखांहून अधिक रुपये उकळले. त्यानंतर पीडितेने Erayani विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि प्रकरण न्यायालयात पोहोचलं. सध्या इरायणीविरुद्ध खटला सुरू असून, दोषी ठरल्यास तिला 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. या घटनेबाबत पीडितेचं म्हणणं आहे की, लग्नानंतर अनेक दिवस Erayani ने तिला हात लावला नाही. तो नेहमी काहीतरी कारण सांगून तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असे. नंतर, शारिरीक संबंधादरम्यान तो नेहमी लाईट बंद करत असे आणि पत्नीच्या डोळ्यावर पट्टी बांधत असे.