जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लव्ह मॅरेजमुळे संतापलेल्या भावांनी भर बाजारात केली बहिणीची हत्या, 3 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

लव्ह मॅरेजमुळे संतापलेल्या भावांनी भर बाजारात केली बहिणीची हत्या, 3 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

लव्ह मॅरेजमुळे संतापलेल्या भावांनी भर बाजारात केली बहिणीची हत्या, 3 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

या तरूणीनं प्रियकरासोबत 3 महिन्यांपूर्वी लग्न (Love Marriage) केले होते. तरूणीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. याच नाराजीतून तिची भर बाजारात हत्या करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 जून : शिक्षण आणि रोजगारामुळे समाजाची कितीही प्रगती झाली असली तरी अजूनही काही अनिष्ट प्रथा समाजात कायम आहेत. प्रेम विवाहाला (Love Marriage) होणारा विरोध ही त्यापैकी एक प्रकार आहे. घरच्यांचा विरोध करून प्रेम विवाह केलेल्या जोडप्यांना किंवा दोघांपैकी एकाला जीव गमावावा लागल्याचा प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला असून यामध्ये प्रेमविवाह केलेल्या बहिणीची तिच्या भावांनी भर बजारात धारधार शस्त्रांनी हत्या केली आहे. पंजाब (Punjab) मधील तरनतारन जिल्ह्यातील हा प्रकार आहे. येथील तरूणीनं  प्रियकरासोबत 3 महिन्यांपूर्वी लग्न केले होते. तरूणीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. याच नाराजीतून तिच्या सख्या आणि चुलत भावानी मिळून तरूणीची भर बाजारात हत्या केली. स्नेहा असं या मृत तरूणीचे नाव आहे. स्नेहाचे राजन जोशन या तरूणावर प्रेम होते. स्नेहाचे हे प्रेम तिच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यांनी तिला लग्नाला परवानगी नाकारली होती. घरच्यांचा विरोधाला न जुमानता स्नेहानं तीन महिन्यांपूर्वी स्थानिक कोर्टात लग्न केले होते. शुक्रवारी रात्री स्नेहा काही सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती. त्यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या तिच्या भावांनी स्नेहावर हल्ला केला. सासऱ्याने मुलाच्या मृत्यूनंतर सुनेची केली भयावह अवस्था दोन्ही भावांनी भर बाजारात धारधार शस्त्रांनी स्नेहावर केला. या हल्ल्यानंतर स्नेहा पाच मिनिट तडफडत होती पण कुणीही तिला मदत केली नाही. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात तरूणीचा सख्या भाऊ रोहित आणि चुलत भाऊ अमर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात