मुंबई, 16 जून : मुंबईच्या (Mumbai News) अंधेरी भागातील एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ज्या आईने 9 महिने आपल्या गर्भात बाळ ठेवून वाढवलं, तिचाच जीव घेतल्याची घटना अनेकांसाठी हैराण करणारी आहे. काही दिवसांपूर्वी एका 16 वर्षांच्या मुलाने आपल्या आईची हत्या केली होती, त्यात आता एका आईने आपल्या 19 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली. या दोन्ही घटना संताप व्यक्त करणाऱ्या आहेतच, शिवाय आई- मुलं या नात्याविषयी सवाल उपस्थित करणाऱ्याही आहे. अंधेरीतील एका आईने आपल्या 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना (Shocking News) उघडकीस आली आहे. महिलेने गळा दाबून 19 वर्षीय मुलीची (Mother killed her daughter) हत्या केली. हे वृत्त वाचून अनेकांना धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणी मुलीच्या हत्येची घटना अंधेरी पोलीस ठाण्याच्या परशीवाडा भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणी ही मनोरुग्ण होती. त्यातून तिची हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. 15 जून रोजी सायंकाळी आईने आपल्या 19 वर्षीय मुलीची हत्या केली आणि मुंबई पोलीस कंट्रोल रूमला फोन करून याबाबत सूचना दिली. तिने सांगितलं की, माझ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर अंधेरी पोलिसांनी हत्येचं प्रकरण दाखल करीत आईची चौकशी केली, तर तिने हत्येचा गुन्हा कबुल केला. 19 वर्षीय तरुणी मानसिक आजारी होती. त्यामुळे आईला सतत तिच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं. यामुळे महिला त्रस्त झाली होती. शेवटी मुलीची हत्या करून तिने हा त्रासच संपवला. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तरुणी 8 महिन्यांची असताना खाली पडल्याने तिला ब्रेन हॅमरेज झाला होता. तेव्हापासून तिला मानसिक आजार जडला होता. सध्या अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत महिलेला अटक केली आहे. अंधेरी पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहे.