JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / महिला रुग्णांना KISS करायचा परदेशातील डॉक्टर; कोर्टात म्हणाला 'भारतात ट्रेनिंगदरम्यान शिकवलं गेलं'

महिला रुग्णांना KISS करायचा परदेशातील डॉक्टर; कोर्टात म्हणाला 'भारतात ट्रेनिंगदरम्यान शिकवलं गेलं'

स्कॉटलंडमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या 72 वर्षीय भारतीय वंशाच्या डॉक्टरला 35 वर्षांपासून 48 महिला रुग्णांवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment of Women Patients) केल्याप्रकरणी गुरुवारी दोषी ठरविण्यात आलं.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 एप्रिल : डॉक्टर म्हटलं की आपल्या मनात एक वेगळा आदर त्या व्यक्तीबद्दल आपोआपच निर्माण होतो. दिवसरात्र रुग्णांची सेवा करणारे हे डॉक्टर दररोज कित्येक लोकांना नवं जीवन देतात. मात्र, अनेकदा डॉक्टरांचे असेही काही कारनामे समोर येतात, ज्याबद्दल कोणी विचारही केलेला नसेल. सध्या असंच एक प्रकरण स्कॉटलंडमधून समोर आलं आहे. बेडवर बसून गेम खेळताना मागून काकी आली अन्…छतावर आढळला जशचा मृतदेह स्कॉटलंडमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या 72 वर्षीय भारतीय वंशाच्या डॉक्टरला 35 वर्षांपासून 48 महिला रुग्णांवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment of Women Patients) केल्याप्रकरणी गुरुवारी दोषी ठरविण्यात आलं. जनरल प्रॅक्टिशनर कृष्णा सिंह यांच्यावर चुंबन म्हणजेच किस घेणं, शरीराच्या अवयवांना स्पर्श करणं, अयोग्य पद्धतीने तपासणी करणे आणि महिला रुग्णांसोबत घाणेरडं बोलणं असे आरोप आहेत. मात्र, ग्लासगो उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. डॉक्टराने आपल्या बचावात सांगितलं की, रुग्ण ज्या आरोपांबद्दल बोलत आहे त्या फक्त काही तपासण्या होत्या. हे त्याला भारतात वैद्यकीय प्रशिक्षणादरम्यान शिकवलं गेलं होतं. त्यामुळे रुग्णांचे आरोप चुकीचे आहेत. Love Marriage च्या दुसऱ्या दिवशी पतीची पत्नीकडून विचित्र मागणी; 2 मित्रांसमोर घडलं भयंकर कृत्य पीडितांच्या वकील अँजेला ग्रे यांनी कोर्टात सांगितलं की, डॉ. सिंह नियमितपणे महिलांचा लैंगिक छळ करत असे. लैंगिक छळ हा त्याच्या कामाच्या आयुष्यातील एक भागच झाला होता. कधी तो कारणं शोधून तर कधी उघडपणे महिला रुग्णांचा लैंगिक छळ करत असे. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायालय आता पुढील महिन्यात आरोपीला शिक्षा सुनावणार आहे. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी दोषी डॉ. सिंहला पासपोर्ट जमा करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या