Home /News /crime /

Love Marriage च्या दुसऱ्या दिवशी पतीची पत्नीकडून विचित्र मागणी; 2 मित्रांसमोर घडलं भयंकर कृत्य

Love Marriage च्या दुसऱ्या दिवशी पतीची पत्नीकडून विचित्र मागणी; 2 मित्रांसमोर घडलं भयंकर कृत्य

Love Marriage च्या दुसऱ्या दिवशी पतीने पत्नीकडून विचित्र मागणी केली. यामुळे संतापलेल्या महिलेने थेट पोलीस स्टेशनचं दार ठोठावलं.

  भोपाळ, 14 एप्रिल : इंदूरमध्ये (Madhya Pradesh News) एका तरुणीवर तिच्याच पतीने सामूहिक बलात्कार करवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेम विवाह केल्याच्या दोन दिवसानंतर हा प्रकार झाला. या प्रकरणात महिलेच्या पतीने सांगितलं की, मित्रांनी लग्न करवून देण्यात खूप मदत केली आहे, यांना देखील खूश कर. यानंतर पतीच्या दोन्ही मित्रांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. यानंतर तरुणीने या प्रकरणात आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

  विदिशातील तरुणीने (19) पोलिसांना सांगितलं की, छोटेलाल मीणा (24) लग्नाच्या नावाखाली मला 9 एप्रिल रोजी इंदूरला घेऊन आले होते. येथे त्यांनी लग्न केलं होतं. याच्या दुसऱ्या दिवशी पती आणि त्याच्या दोन मित्रांसोबत बसून दारू प्यायले. यानंतर पती तरुणीला म्हणाला, दोघांनी आपलं लग्न लावून दिलं आहे. म्हणून त्यांनाही खूश कर. यानंतर आंनद मीणा (21) आणि दीपक मीणा (24) या दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याशिवाय या प्रकरणात कोणालाही काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली.

  हे ही वाचा-बाप आहे की हैवान! तब्बल 4 वर्ष मुलाचा मृतदेह किचनमध्येच, वडिलांचं म्हणणं ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

  TI इंद्रेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि छोटेलाल यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांनी इंदूर आझाद नगर आर्य समाज मंदिरात लग्न केलं. येथे त्यांच्यासोबत आनंद मीणा आणि दीपक मीणा सोबत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

   

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Gang Rape, Indore, Madhya pradesh, Marriage

  पुढील बातम्या