JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / 3 भावांनी सख्ख्या बहिणीला मारलं; मग पाय बांधून धक्कादायक कृत्य, हादरवणारं कारण समोर

3 भावांनी सख्ख्या बहिणीला मारलं; मग पाय बांधून धक्कादायक कृत्य, हादरवणारं कारण समोर

पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनिताचा पती मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. यामुळे ती पतीसोबत आग्रा येथे भाड्याच्या घरात राहत होती

जाहिरात

भावांनी बहिणीला मारलं (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर 28 जून : भाऊ आणि बहिणीचं नातं अतिशय खास असतं. आई-वडिलांनंतर आपल्यावर कोणी निस्वार्थी प्रेम करत असेल तर ते आपले भाऊ-बहीण असतात, असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. मात्र आता एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या धौलपूर येथील बसई डांग पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिची ओळख पटली आहे. महिलेच्या हत्येचा आरोप तिच्या तीन सख्ख्या भावांवर आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या दिराने फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अवैध संबंधामुळे ही हत्या करण्यात आल्याचं समोर येत आहे. बसई डांग स्टेशन हाऊस ऑफिसर मोहन सिंह यांनी सांगितलं की, महिलेचं नाव अनिता प्रजापत असं असून ती 35 वर्षांची होती. ती आग्रा येथील रहिवासी होती. याप्रकरणी महिलेच्या दिराने गुन्हा दाखल केला आहे. महिलेचं माहेर आग्राच्या मधु नगरमध्ये असून, गणेश नगर दयाळ बागेत तिचं सासर आहे. Crime News : अनेक दिवसांपासून रखडलेली मर्डर केस एका Condom मुळे सॉल्व पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनिताचा पती मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. यामुळे ती पतीसोबत आग्रा येथे भाड्याच्या घरात राहत होती. तिथे तिचे अन्य एका भाडेकरूसोबत अवैध संबंध होते. माहेरकडील लोकांना तिच्या अवैध संबंधांची माहिती मिळाली होती. यावर भावांनी महिलेला समजावल्याचंही सांगितलं जात आहे. पण त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. 22 जून रोजी महिलेचे भाऊ लोकेश, राजू आणि विकास यांनी तिला माहेरी नेण्याच्या बहाण्याने सासरच्या घरातून नेलं. त्यानंतर शुक्रवारी बसई डांग परिसरातील निभी का ताल येथे महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला. महिलेचे हातपाय बांधलेले असल्याने पोलिसांनी हत्येची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर तिच्या तीन भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता ही तिच्या भावांची एकुलती एक बहीण होती. अनिताला चार भाऊ आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शनिवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या