JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Crime News: 3 महिन्यांतच मोडली सुखी संसाराची स्वप्नं; प्रेमविवाहानंतर 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Crime News: 3 महिन्यांतच मोडली सुखी संसाराची स्वप्नं; प्रेमविवाहानंतर 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

सलोनी वैभव म्हात्रे असं या तरुणीचं नाव आहे. यंदाच मे महिन्यात तिने वैभव म्हात्रे (वय20) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता.

जाहिरात

प्रेमविवाहानंतर तरुणीची आत्महत्या( प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी मुंबई 18 जुलै : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात असलेला माणूस मागचा-पुढचा काहीही विचार न करता समोरच्याची साथ देत राहातो. मात्र काहीवेळा याचा भलताच परिणामही भोगावा लागतो. अशीच एक घटना आता उलवे परिसरातील मोरावे या गावातून समोर आली आहे. यात एका 19 वर्षीय तरुणीने लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यांत गळफास घेऊन आत्महत्या केली. पती आणि सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून तिने राहात्या घरातच आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना समोर आली. सलोनी वैभव म्हात्रे असं या तरुणीचं नाव आहे. यंदाच मे महिन्यात तिने वैभव म्हात्रे (वय20) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. दोघांच्या रिलेशनशिपबद्दल समजल्यावर घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं होतं. Looter bride real story: 20 पुरुषांशी लग्न करुन लावला चुना; विवाहानंतर फक्त एक गोष्ट व्हायची, ‘लुटेरी दुल्हन’ची रियल स्टोरी तरुणीचा पती वैभव हा नोकरी किंवा काहीही व्यवसाय करत नव्हता. त्यामुळे तो सलोनीलाच माहेरहून पैसे आणण्यास सांगत असे. आई-वडिलही तिचा संसार व्यवस्थित चालावा यासाठी तिला पैसे पुरवत असत. मात्र दीर आणि सासूही तिचा छळ करत होते आणि तिला काही ना काही कारणाने त्रास द्यायचे. शनिवारी सलोनीची आई तिला जेवणाचा डबा घेऊनही गेली होती. रविवारी दुपारी तिचा भाऊदेखील पैसे घेऊन तिच्या घरी गेला होता. मात्र, त्याला घरात कोणीच दिसलं नाही. बहीणही इथे नव्हती. मग चौकशी केली असता, त्याला समजलं की सलोनीला रुग्णालयात दाखल केलं आहे. लगेचच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली मात्र सलोनीचा मृत्यू झाला होता. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समजताच तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. यावरुन सासू, पती आणि दीराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या