जयपूर, 17 सप्टेंबर : नशेत असणाऱ्या तरुणाने (Young man) एका 60 वर्षांच्या महिलेचा (60 year old woman) गळा दाबून खून (murder) केल्याची आणि त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीला आली आहे. दारूच्या नशेत असणारा हा तरुण महिलेच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने तिच्याकडे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. महिलेनं नकार दिल्यावर त्याने तिचा खून करून प्रेतावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. असा घडला प्रकार ही घटना आहे राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील. बुधवारी रात्री 19 वर्षांचा एक तरुण दारुच्या नशेत तर्र होता. तो रस्त्यावरून इकडेतिकडे फिरत होता. अचानक तो एका 60 वर्षांच्या महिलेच्या घरात शिरला. ही महिला घरी एकटीच होती. ते पाहून त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.. महिलेने स्पष्ट नकार देत त्याला निघून जायला सांगितलं. त्यानंतर तरुणाने तिच्याशी लगट करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने विरोध केल्यामुळे तरुणाला त्यात यश आले नाही. या प्रकाराने रागाचा पारा चढलेल्या तरुणाने महिलेचा गळा पकडला आणि जोरात दाबला. या महिलेने तरुणापासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला यश आले नाही. तरुणाने गळा दाबून तिची हत्या केली. महिलेचा प्राण गेल्यानंतरही या नराधमाची वासना शांत झाली नाही. त्याने मृतदेहावरच बलात्कार केला आणि मग तिथून निघून गेला. हे वाचा - मित्रांनी घात केला, मुलांकडे लक्ष दे, पत्नीला फोन करून रिक्षाचालकाने संपवलं जीवन पोलीस तपास सुरु ही घटना समजताच पोलिसांनी कारवाई करत तरुणाचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. महिलेचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून तरुणावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र आपल्या आजीच्या वयाच्या महिलेसोबत तरुणाने केलेला हा घृणास्पद प्रकार समोर आल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.