सातारा, 17 सप्टेंबर: साताऱ्यातील करंजे पेठेतील एका रिक्षाचालकानं आत्महत्या (Rickshaw Driver Commits Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आली. जवळच्याच मित्रांनी ब्लॅकमेल (Blackmail in satara) करत त्रास दिल्यानं संबंधित रिक्षाचालकानं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रिक्षाचालकानं आपल्या पत्नीला फोन करून ‘ब्लॅकमेलिंग करून मला लुटले असून, हे आता मला सहन होत नाही; मुलांकडे लक्ष दे’ असं म्हणत रिक्षाचालकानं मृत्यूला कवटाळलं आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. विजय ननावरे असं आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचं नाव आहे. तर शेखर आंग्रे, राजू पोतनीस आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रिक्षाचालक विजय ननावरे यांचं आरोपींविरोधात चांगले संबंध होते. दरम्यान विजय ननावरे यांचं विवाहबाह्य संबंध सुरू असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. यामुळे आरोपींनी ‘अनैतिक संबंधांची माहिती तुझ्या पत्नीला देईन,’ अशी धमकी देत विजय यांच्याकडून लाखो रुपये लुबाडले होते. हेही वाचा- मित्रानेच तोडले हात-पाय, शिरही केलं धडावेगळं, मुंबईतील थरारक घटनेचं उलगडलं गूढ लाखो रुपये घेऊनही ब्लॅकमेलिंग सुरूच ठेवल्याने विजयने आरोपींच्या त्रासाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. 4 सप्टेंबर रोजी विजय ननावरे यांनी पत्नी वैशालीला फोन करून ‘राजू, शेखर व संबंधित महिलेकडून मला त्रास होत आहे. त्यांनी मला ब्लॅकमेलिंग करून लुटलं आहे. हे आता मला सहन होत नाही. मुलांकडे लक्ष दे,’ असे म्हणून फोन ठेवला होता. त्यानंतर विजय यांनी पत्नीला एक मेसेजही पाठवला आहे. हेही वाचा- आधी विश्वासात घेतलं मग करायला लावलं भलतंच; FB मैत्रिणीकडून पुण्यातील तरुणाचा गेम विजयचा फोन आल्यानंतर पत्नी वैशाली यांनी या घटनेची माहिती दीर रमेश ननावरे यांना दिली. दोन्ही अनेकदा फोन करत त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर विजय हा ‘सुरुबन’ हॉटेलकडे गेल्याची माहिती यांना मिळाली. दीर रमेश आणि मृताची पत्नी वैशाली घटनास्थळी पोहोचले असता, त्याठिकाणी आरोपी शेखर, राजू आणि संबंधित महिला उभी होती. त्यांनीच विजयने आत्महत्या केल्याची माहिती वैशाली यांना दिली. या घटनेनंतर वैशाली यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात वरील तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.