JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Shocking! 56 वर्षीय व्यक्ती 14 महिन्यांत तब्बल 78 वेळा Corona Positive; डॉक्टरांनी सांगितलं असं का झालं?

Shocking! 56 वर्षीय व्यक्ती 14 महिन्यांत तब्बल 78 वेळा Corona Positive; डॉक्टरांनी सांगितलं असं का झालं?

Shocking news:14 महिन्यांत 78 वेळा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही व्यक्ती आयसोलेशनमध्येच आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंकारा, 09 फेब्रुवारी: कोरोनाचं निदान झालं तरी पायाखालची जमीन सरकते (Coronavirus reinfection). एकदा कोरोना झाला की पुन्हा संसर्ग झाल्याचीही बरीच प्रकरणं समोर आली आहेत. पण तुम्हाला फक्त ऐकूनच धडकी भरेल की एका व्यक्तीला एकदा, दोनदा नाही तर तब्बल 78 वेळा कोरोना झाला आहे (Man 78 Times Tested Corona Positive). तुर्कस्तानातील (Turkey) ही व्यक्ती गेल्या 14 महिन्यांत 78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. वर्षभरापासून ती रुग्णालयातच आहे (Man Has Been in Isolation for 14 Months). 56 वर्षांचा मुझफ्फर कायासन (Muzaffer Kayasan) नोव्हेंबर 2020 साली त्याला पहिल्यांदा कोरोना झाला. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. काही दिवसांनी त्याच्यातील लक्षणं कमी झाली. पण जेव्हा पुन्हा कोरोना टेस्ट केली तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला नाही. हे वाचा -  बापरे! कोरोना संसर्गानंतर फुटला व्यक्तीचा Private part; भयंकर कोरोना साइड इफेक्ट 78 वेळा त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. पण प्रत्येक वेळेला त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हच येतो. त्यामुळे तो पुन्हा आयसोलेशनमध्ये जातो. यामुळे त्याचं सामाजिक आयुष्यच संपलं आहे. ना तो आपल्या मित्रमैत्रिणींना भेटू शकत ना कुटुंबासोबत वेळ घालवू शकत. खिडकीतून तो आपल्या कुटुंबासोबत थोडाफार संवाद साधतो. पण आपल्या प्रिय व्यक्तींना आपण स्पर्श करू शकत नाही, त्यांना प्रेमान जवळ घेऊ शकत नाही, याचं सर्वात जास्त दुःख त्यााल वाटतं. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नसल्याने तो कोरोना लसही घेऊ शकला नाही. हे वाचा -  Corona च्या महामारीत आनंदाची बातमी, भारतातला पहिला Nasal Spray launch; असा होणार फायदा कायासनला ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. ज्यामध्ये आजारांशी लढणाऱ्या व्हाइड ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात आणि रुग्णाची इम्युनिटी खूप कमी होते. डॉक्टरांनी सांगितलं यामुळेच कायासनच्या रक्तातील कोरोनाव्हायरस नष्ट होत नाही आहे. त्याला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी औषध दिलं जात आहे. पण ही प्रक्रिया संथ आणि खूप मोठी आहे. जगातील हे असं पहिलं प्रकरण आहे, ज्यामध्ये रुग्ण इतक्या कालावधीपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या