JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आलाय तरीपण कोरोनाची लक्षणं आहेत; हे कारण असू शकते

RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आलाय तरीपण कोरोनाची लक्षणं आहेत; हे कारण असू शकते

आयसोलेशनचा कालावधी 14 दिवसांवरून 7 दिवसांवर आणण्यात आला आहे. सात दिवसांत हा संसर्ग संपत असल्याचं म्हटलं जात आहे. असं असूनही, आरटीपीसीआर (RTPCR ) रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही कोविडची लक्षणं संपत नसल्याचं अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे.

जाहिरात

corona

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जानेवारी : कोरोना-ओमिक्रॉन संसर्गामुळे (Coronavirus) भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. आता दररोज कोविड बाधितांची दीड लाखांहून अधिक प्रकरणं समोर येत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1.79 लाख कोविड रुग्णांची नोंद झाली. मात्र, नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता कोविड रूग्णांसाठी क्वारंटाइन किंवा आयसोलेशनचा कालावधी 14 दिवसांवरून 7 दिवसांवर आणण्यात आला आहे. सात दिवसांत हा संसर्ग संपत असल्याचं म्हटलं जात आहे. असं असूनही, आरटीपीसीआर (RTPCR ) रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही कोविडची लक्षणं संपत नसल्याचं अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. रुग्णांना खोकला, सर्दी, डोकेदुखी, घसादुखी किंवा अंगदुखी आदी त्रास सुरूच राहत आहे. त्यामुळं सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आणि संसर्गातून बरं झाल्यानंतरही लक्षणं का कायम राहतात? जर या समस्या असतील तर ती धोक्याची बाब आहे का? या संदर्भात गुरुग्रामच्या मॅक्स हॉस्पिटलचे सहयोगी संचालक डॉ. शैलेश सहाय यांनी न्यूज 18 शी संवाद साधताना सांगतलं की, सध्या जे कोरोनाचे रुग्ण पुढे येत आहेत, ते लक्षणं नसलेले, सौम्य किंवा मध्यम लक्षणं असलेले आहेत. कारणं काहीही असोत, ओमिक्रॉन असो की कोरोना लसीकरण, पण गंभीर रुग्ण सध्या समोर येत नाहीयेत. अशा परिस्थितीत, ICMR ने या वेळेस रुग्ण कोविडच्या संसर्गातून सात दिवसात बरा होत आहे, अशी मार्गदर्शक तत्त्वंदेखील दिली आहेत. एखाद्याला अधिक समस्या किंवा लक्षणं असल्यास, जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत विलगीकरणात ठेवणं पुरेसं आहे. त्यामुळं रुग्ण 7 ते 10 दिवसांत कोरोना संसर्गामधून बरा होत आहे. शिवाय, जर रुग्णालयात दाखल केले नाही, तर रुग्णाला संसर्गमुक्त घोषित करण्यासाठी पुन्हा आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता नाही. हे वाचा -  Food Combination: सावधान! दह्यासोबत या गोष्टी खाणं आजच थांबवा; अनेक आजार लागतील मागे निगेटिव्ह रिपोर्ट असूनही लक्षणे कायम राहिल्यास हे आजारही असू शकतात - डॉ. सहाय सांगतात की, अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून येत आहे की, सात दिवस उलटून गेल्यानंतर रुग्णाचा आरटीपीसीआर रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह येत आहे. परंतु, कोरोना संसर्गाची लक्षणं जसं की, सर्दी, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी किंवा ताप अजूनही आहेत. अशा परिस्थितीत त्या लक्षणांमागे दुसरं काही कारण असू शकतं. डॉ. सहाय म्हणतात की संसर्ग संपल्यानंतरही ही लक्षणे दिसणे म्हणजे रुग्णाला आणखी एखादी किंवा काही जास्त समस्या आहेत. रुग्णाला घसा, पोट किंवा छातीत जंतुसंसर्ग असू शकतो किंवा लघवी संसर्गामुळेही (युरिन इन्फेक्शन - urine infection) ताप आणि इतर समस्या उद्भवलेल्या असू शकतात. अशा परिस्थितीत या आजारांची तपासणी करून डॉक्टरांना दाखवून उपचार करणं आवश्यक आहे. हे वाचा -  खरंच! लस घेतलेल्यांना ICU मध्ये दाखल करावं लागत नाही; डॉक्टरांनी सांगितले त्याविषयी या परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही डॉ. सहाय म्हणतात की, नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या संपूर्ण कोविड कालावधीत कोणतीही लक्षणं असतील किंवा नसतील, परंतु 7 दिवसांच्या क्वारंटाईननंतर रुग्ण स्वतःच संसर्गापासून मुक्त होत आहेत. संसर्गाची लक्षणं अजूनही आहेत असं गृहीत धरलं, तरी रक्तातील ऑक्सिजनची पातळी 94 च्या वर असेल आणि खाली जात नसेल तर घाबरण्याची गरज नाही. म्हणून, कोणतीही समस्या किंवा लक्षणं असल्यास, रुग्णानं नियमितपणे पल्स-ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजनची पातळी मोजली पाहिजे. मात्र, ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या