मुंबई, 08 जानेवारी : सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकारानं जगभरात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आणली आहे. सर्वाधिक वेगानं संसर्ग पसरवणाऱ्या या विषाणूमुळं एका दिवसात रुग्ण संख्या कित्येक हजारांनी वाढत आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्सम ब्रिटन या देशांसह आपल्या देशातही ओमिक्रॉननं थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशात (India) आतापर्यंत ओमिक्रॉनचे 3007 रुग्ण आढळले असून, त्यातील 1199 रुग्ण बरे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात असून, लोकांना ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत **(Omicron Symptoms)**जागरूक केलं जात आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात एम्सनं (AIIMS) ओमिक्रॉनच्या संसर्गाची पाच मुख्य लक्षणं सांगितली आहेत. अमेरिकेच्या (USA) सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अॅनालिसिसनं खोकला, थकवा, कफ, नाक वाहणे ही ओमिक्रॉन संसर्गाची चार प्रमुख लक्षणं असल्याचं म्हटलं आहे. ही लक्षणं दिसल्यास तत्काळ कोरोना संसर्गाची चाचणी करणं आवश्यक असून क्वारंटाईन अर्थात विलगीकरणात जाणं महत्त्वाचं आहे. संसर्ग झाला नसल्याचं अहवालात आढळल्यानंतर क्वारंटाईनमधून बाहेर येता येईल. तर श्वास घेण्यास त्रास होणं, ऑक्सिजन पातळीत घट, छातीत सतत वेदना होणं किंवा छाती दडपल्यासारखं जाणवणे, मानसिकदृष्ट्या गोंधळाची स्थिती निर्माण होणं किंवा प्रतिसाद न देणं आणि ही लक्षणं सलग 3 ते 4 दिवस दिसत असतील आणि त्यात वाढ होत असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे, असं एम्सनं स्पष्ट केलं आहे. हे वाचा - परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी होम क्वारंटाइनचे दिवस ठरले, ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध कडक अमेरिकेतील इलिनॉइस डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. एनगोजी एझिक यांच्या मते, संसर्ग होणं आणि त्याची लक्षणं दिसणं याचा कालावधी बदलू शकतो, त्यामुळं लवकर चाचणी (Coroan Test) करून घेणाऱ्या लोकांनी नकारात्मक अहवाल (Negative Report) आला असला तरी काही दिवसांनी पुन्हा चाचणी करून घेणं आवश्यक आहे. घशात खवखव, डोकेदुखी, हलका ताप, अंगदुखी ही देखील याची लक्षणं आहेत. लक्षणं दिसली म्हणून लगेच चाचणी करून घेणाऱ्या लोकांनी अहवाल नकारात्मक आल्यास आपल्याला संसर्ग झालेला नाही, अशा भ्रमात राहू नये. काही दिवसांनी पुन्हा चाचणी करून घ्यावी असं डॉ. एझिक यांनी म्हटलं आहे. हे वाचा - ‘Omicron ला सौम्य समजण्याची चूक करू नका’, WHO ने केलं अलर्ट लस न घेतलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण एखाद्या संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा संशय असेल तर त्यांनी तत्काळ स्वतःला क्वारंटाईन (Quartine) करावं. यानंतर लक्षणं दिसत आहेत का हे बघावं. लक्षणं दिसत नसतील तर तज्ञांच्या सल्ल्यानं क्वारंटाईनमधून बाहेर पडावं. लसीकरण झालं असेल आणि संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं तरी अशा व्यक्तींनी आयसोलेट होणं गरजेचं आहे.