JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / coronavirus : 8 महिने उपचार, 8 कोटी रुपये खर्च; तरीही वाचू शकला नाही शेतकऱ्याचा जीव

coronavirus : 8 महिने उपचार, 8 कोटी रुपये खर्च; तरीही वाचू शकला नाही शेतकऱ्याचा जीव

कोरोनाच्या delta variant च्या कचाट्यात सापडलेल्या एका शेतकऱ्याला वाचवण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले तरीदेखील त्याचा जीव वाचवू शकले नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रीवा (मध्य प्रदेश), 13  जानेवारी -  गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीनं (coronavirus pandemic) धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनानं पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाखो लोकांचा बळी घेतला असून (Corona deaths in India) आता तिसऱ्या लाटेला (COvid-19 third wave) सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांपैकी दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक लोकांचे जीव गेले. दुसऱ्या लाटेतील डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) सर्वात जास्त जीवघेणा होता. डेल्टा व्हेरिएंटच्या कचाट्यात सापडलेल्या एका शेतकऱ्याला (Farmer) वाचवण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले तरीदेखील त्याचा जीव वाचवू शकले नाही. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा (Rewa) येथील प्रगतीशील शेतकरी धर्मजय सिंह (Dharmajay Singh) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मऊगंज तालुक्यातील रकरी गावचे ते रहिवासी होते. आपल्या 200 एकर जमिनीत त्यांनी आधुनिक पद्धतीनं शेती केली होती. या शेती व्यवसायामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. धर्मजय सिंह यांच्या उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबानं 50 एकर शेती विकून आठ कोटी रुपये खर्च केले. कोरोनाच्या उपचारांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे.

Wuhan Lab मध्येच Corona व्हायरस तयार करण्यात आला, ई-मेलवरून झाला खुलासा

50 एकर शेती विकली गेल्या वर्षी (2021) एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Covid second wave) धर्मजय सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात (Sanjay Gandhi Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. धर्मजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांना चेन्नईतील (Chennai) अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल केलं होतं. तिथे त्यांच्यावर आठ महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या उपचारांसाठी आतापर्यंत आठ कोटी रुपये खर्च झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. यासाठी त्यांच्या 200 एकरपैकी 50 एकर शेतीही विकल्याचंही त्यांनी सांगितलं. इंग्लंडच्या डॉक्टरांकडून मॉनिटरिंग लंडनमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये धर्मजय सिंह यांचे उपचार सुरू होते. त्यांची तपासणी करण्यासाठी लंडनहून (London) डॉक्टर चेन्नईला येत होते. याशिवाय उपचारांदरम्यान इतर अनेक देशांतील डॉक्टरांचाही सल्ला घेण्यात आला होता. प्रगतीशील शेतकरी म्हणून धर्मजय सिंह विंध्य परिसरामध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या कुटुंबाकडे 200 एकर जमीन होती. या जमिनीवर स्ट्रॉबेरी (Strawberry farming) आणि गुलाबाची लागवड केली जाते. आपल्या शेतीत सिंह यांनी वेगवेगळे प्रयोग केले होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाला होता. गेल्यावर्षी 26 जानेवारीला रीवा येथे ध्वजारोहणासाठी आलेल्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही त्यांचा सत्कार केला होता. धर्माजय सिंह यांच्या फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. त्यामुळे अथक प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात यश मिळालं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या