JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / खरंच! लस घेतलेल्यांना ICU मध्ये दाखल करावं लागत नाही; डॉक्टरांनी सांगितले त्याविषयी

खरंच! लस घेतलेल्यांना ICU मध्ये दाखल करावं लागत नाही; डॉक्टरांनी सांगितले त्याविषयी

Corona virus update news: ताज्या आकडेवारीवरून हे सिद्ध होत आहे की, लस घेणार्‍या लोकांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे कमी दिसून येत आहेत. ब्रिटनमधील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित आणि आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एकाही व्यक्तीने लसीचा डोस घेतलेला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जानेवारी : जगभरात कोरोना विषाणूचा (Corona virus) कहर सुरूच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहिती (WHO) नुसार, गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाचे 17 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधित लसीचा परिणाम होत आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या लसी कोरोनापासून 100 टक्के संरक्षणाची हमी देत नाहीत, असे शास्त्रज्ञांकडून आधीच सांगितले जात असले तरी, ताज्या आकडेवारीवरून हे सिद्ध होत आहे की, लस घेणार्‍या लोकांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे कमी दिसून येत आहेत. ब्रिटनमधील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित आणि आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एकाही व्यक्तीने लसीचा डोस घेतलेला नाही. म्हणजेच लस घेणाऱ्या लोकांना नक्कीच फायदा होत आहे, हे दिसून येत आहे. लसीकरण न झालेले आयसीयूमध्ये यूकेच्या साउथ वेल्समधील ग्रँज युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये (Grange University Hospital) अतिदक्षता विभागात काम करणारे डॉक्टर डेव्हिड हेपबर्न (Dr David Hepburn) यांनी सांगितले की, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ज्या लोकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी कोणीही लस घेतलेली नाही. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण पाहता हे रुग्णालय चार महिन्यांपूर्वी नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आले होते. डॉक्टर डेव्हिड हेपबर्न यांनी सांगितले की, त्यांच्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये अशा कोणत्याही व्यक्तीला दाखल करण्यात आले नव्हते, ज्याने लस घेतली होती. सर्व लसीकरण न केलेले रुग्ण होते. ते म्हणाले की, सध्या माझ्या रुग्णालयात केवळ एकच व्यक्ती आयसीयूमध्ये आहे ज्याचे लसीकरण झालेले आहे. हे वाचा -  Vastu Tips: घरात वारंवार पैशांची चणचण भासते का? वास्तुदोषाचे हे असेल कारण, जाणून घ्या उपाय लस न घेतलेले 60 टक्के आयसीयूमध्ये इंग्लंडमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लोकांपैकी फक्त 9 टक्के लोकांना आयसीयूमध्ये नेण्याची गरज पडत आहे. आकडेवारीनुसार, यापैकी 60 टक्के लोक असे आहेत, ज्यांनी लस घेतलेली नाही. सध्याच्या ओमिक्रॉन प्रकाराला रोखण्यासाठी, आरोग्य मंत्रालयाने प्रत्येकाला बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये 45 टक्क्यांची घट झाली आहे. दुसरीकडे, WHO ने इशारा दिला आहे की येत्या दोन महिन्यांत युरोपातील निम्म्या लोकांना ओमिक्रॉनची लागण होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या